Beed crime prevention : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालून कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरुच आहे.
अशाच एका मटका चालक आणि दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवर एमपीआयडी अंतर्गत कारवाई करुन त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलिस (Police) ठाणे अंबाजोगाई शहर व पोलिस ठाणे तलवाडा अंतर्गत गुन्हे नोंद असलेल्या या दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीआयडी अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे पाठविला होता. यानुसार गुरुवारी सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या दोघांना आज शुक्रवारी ताब्यात घेत त्यांना हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
अंबाजोगाईतील गोविंद धर्मराज काळे (वय 40) याच्याविरुद्ध मटका खेळणे तसेच खेळवणे, जुगार अड्डा चालविणे, शिवीगाळ व धमक्या देणे अशा गुन्ह्यांची (Crime) नोंद आहे. या आरोपीवर प्रतिबंधक कारवाई झाल्यानंतरही त्याचया वर्तनात सुधारण झाली नाही. तर गोवर्धन सिद्धेश्वर येळजाब (वय 29, रा. रोहितळ, ता. गेवराई) याच्याविरुद्ध महिलांना पळवून नेणे, बलात्कार, दंगल, गंभीर दुखापत, धमक्या तसेच अवैध दारू विक्री अशा स्वरूपाचे चार गंभीर गुन्हे नोंद आहेत.
याच्यावरही पूर्वी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याची गुन्हेगारी वाढतच गेली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोलिस निरीक्षक शरद जोगदंड आणि त्यांच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व त्याच दिवशी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले.
अवैध वाळू वाहतूक व उपसा, मटका, गुटखा तसेच जातीय - धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि दादागिरी व खंडणीखोरी करणाऱ्या गुंडांवर एमपीडीएएए, मकोकासारख्या कडक कारवाया सुरुच राहतील. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिस दल कटीबद्ध असल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.