Beed district malaria officer suspended Sarkarnama
मराठवाडा

Health Officer Suspended : बीड जिल्हा हिवताप विभागाला धक्का : 89 लाखांच्या अतिरिक्त उचलीप्रकरणी अधिकाऱ्यावर कारवाई

Public Health Department : आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी बीडच्या जिल्हा हिवताप विभागात मोठी कारवाई केली असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Jagdish Pansare

Beed News : बीडच्या जिल्हा हिवताप विभागाला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एरिअर्सच्या रकमेपोटी तब्बल नव्वद लाख रुपये अतिरिक्त उचलल्याप्रकरणी जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंग शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय एरिअर्सच्या नावाखाली विजयसिंग शिंदे यांनी 89.43 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम उचलल्याचा गैरप्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणानंतर जिल्हा हिवताप विभागात खळबळ उडाली होती. तर आता जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंग शिंदे यांच्यावर आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारवाई करत थेट त्यांना निलंबित केले आहे. ही कारवाई बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारी ठरली आहे.

आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी आर्थिक अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंग विठ्ठलराव शिंदे (गट-ब) यांना तडकाफडकी निलंबित केले.

जुन्या सेवाविषयक नोंदी नवीन पद्धतीत टाकताना वेतनाच्या नोंदींमध्ये अनियमितता करण्यात आली. त्यानंतर या नोंदी उपकोषागार कार्यालयाकडे सादर करून कर्मचाऱ्यांना एरिअर्स आणि थकबाकीपोटी 89 लाख 43 हजार 154 रुपये इतकी रक्कम अतिरिक्त अदा करण्यात आली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियम तसेच मुंबई वित्तीय नियमांतील तरतुदींचा गंभीर भंग झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आरोग्य विभागातील या लाखांच्या गैरव्यवहारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT