Baban Gitte, Bapu Andhale Sarkarnama
मराठवाडा

Beed Firing Case Update : आंधळे खूनप्रकरणात 4 जणांना अटक; बबन गित्तेच्या शोधासाठी चार पथकं

Beed Parali Firing Case : अटक केलेल्या चौघांवर खुनातील मुख्य आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे

Sunil Balasaheb Dhumal

Beed Political News : परळीतील बँक कॉलनी परिसरात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार झाल्याने संपूर्ण बीड जिल्हा हदरला आहे. या आंधळे खून प्रकरणी केज परिसरातून 6 जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अटक केलेल्या चौघांवर खुनातील मुख्य आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. अधिक चौकशीत या चौघांनी कशा पद्धतीने मदत केली ? हे समोर येऊ शकणार असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तर मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 4 पथके तैनात केली असल्याची माहिती परळी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिली.

परळीतील बँक कॉलनी परिसारत घडलेल्या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला आहे. तर, ग्यानबा उर्फ गोट्या गित्ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ग्यानबा गित्तेने दिलेल्या फिर्यादीत आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी शशिकांत बबन गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ संजीवन नेहरकर, राजेश अशोक वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत काय आहे?

ही घटना शनिवारी (ता. 29) सायंकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान घडली. आरोपींनी कट रचून सरपंच आंधळेंना महादेव गित्तेच्या बँक कॉलनीतील घरी बोलावून घेतले होते. तेथे गित्ते आणि आंधळे यांच्यात शिवीगाळ होऊन बाचाबाची झाली.

त्यानंतर गित्तेंनी बंदूक काढत सरपंच आंधळेंच्या डोक्यात गोळी मारली. तर, राजाभाऊ नेहरकरने डोक्यात कोयत्याने वार केले. त्यात आंधळेंचा मृत्यू झाला.

तर महादेव गित्तेने फिर्यादीस ठार मारण्याच्या हेतूने गोळीबार केला. मात्र ती गोळी छातीच्या उजव्या बाजूला लागली. तर मुकुंद गित्ते आणि राजाभाऊ वाघमोडेने फिर्यादीस मारहाण केली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT