Suresh Kute, Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonwane : सुरेश कुटेंचं नाव घेत मोक्याच्या वेळी बजरंग सोनवणेंनी भाजपला घेरलं

Beed Lok Sabha Constituency : आपण खासदार झाल्यानंतर पहिले पत्र आरबीआयला गोरगरिबांच्या ठेवींबाबत देणार आहोत. गरीबांचा शाप भाजपला लागल्याशिवाय राहणार नाही. मी देखील शेतकऱ्याचे दु:ख जाणतो, गरिबांचे अश्रू ज्या पक्षाला कळत नाहीत

Datta Deshmukh

Beed Political News : सुरेश कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केव्हा केला तर जेव्हा त्यांची ज्ञानराधा बँक बंद पडली. त्यांनी हजारो गोरगरिबांचे पैसे बुडविले. गोर गरिबांचे पैसे, लेकी - बाळीचे लग्न मोडणाऱ्या संस्थानिकांना भाजप अभय देते. भाजपला केवळ श्रीमंत लोक वाचवायचे आहेत. ठेवीदार काय मारायचे आहेत का, असा सवाल करत भाजपला हे पाप फेडावे लागेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे म्हणाले.

आपण खासदार झाल्यानंतर पहिले पत्र आरबीआयला गोरगरिबांच्या ठेवींबाबत देणार आहोत. गरीबांचा शाप भाजपला लागल्याशिवाय राहणार नाही. मी देखील शेतकऱ्याचे दु:ख जाणतो, गरिबांचे अश्रू ज्या पक्षाला कळत नाहीत त्या पक्षाला गरिबांच्या वेदना माफ करणार नसल्याचे बजरंग सोनवणे यांनी म्हटले.

बीड येथील कुटे समुहाची सप्टेंबर महिन्यात आयकर विभागाने तपासणी केली. त्यानंतर ईडीनेही तपासणी केली. त्यांनतर या समुहाचे प्रमुख सुरेश कुटे Suresh Kute अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवदारांच्या ठेवी देणे बंद झाले. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बीडपासून इंदौरपर्यंत ५० शाखा असून साडेसहा लाख ठेवीदारांचे तब्बल दोन हजार कोटी रुपये या मल्टीस्टेटमध्ये अडकले आहेत.

मागील सहा महिन्यांपासून ठेवीदार त्रस्त झाले आहेत. मात्र, सुरेश कुटेंकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, कुटे समुहाची इडी व आयकर विभागाने तपासणी केल्यानंतर ज्ञानराधामधील ठेवी देणे बंद झाले आणि नोव्हेंबरमध्येच कुटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. नागपूरला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा झाला.

जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट, अर्बन संस्थांनी गोर गरिबांच्या ठेवी बुडवल्या आहेत, अशा संस्थाच्या विरोधात आपण भूमिका घेणार आहोत. संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत. लोकसभेत पाहिल्या भाषणात मी ठेवीदारांचे दुख मांडेन, असेही बजरंग सोनवणे म्हणाले. त्यांनी शुक्रवारी सुरेश कुटेंच्या गाव असलेल्या कुटेवाडी येथील सभेत बजरंग सोनवणे Bajrang Sonwane बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बजरंग सोनवणे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था व त्यांचे संचालक मंडळाकडून ठेवीदारांचे पैसे बुडवले आहे. अनेकांच्या घरात लग्नाच्या लेकी आहेत. विद्यार्थ्यांचे उच्यशिक्षण आहे. शेतीचे व्यवहार आहेत. घराचे बांधकाम आहेत. या सर्व कामावर पूर्णविराम आहे. कारण ठेवीदारांचा घामाचा पैसा आहे. आपण आपली खासदारकी सामान्य लोकांच्या विकासासाठी लावणार असून ठेवीदारांचा पैसा परत आणेल, असेही सोनवणे म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT