Beed Loksabha  Sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha Election : बीडच्या मतमोजणीसाठी दोन 'IAS' अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती!

Beed Lok Sabha Election Counting News : बीड लोकसभेची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 4 जून रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरु होईल.

Datta Deshmukh

Beed Lok Sabha Constituency News : लोकसभा निवडणुक चुरशीची आणि उत्कंठावर्धक झाली असून आता मतमोजणीची तारीख जवळ येत आहे. निवडणुकीतील महत्वाच्या मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकेतसाठी निवडणुक आयोगाने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी अजिमुल हक, बस्सवराज आर. सोमन्ना या दोन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

4 जूनला होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रक्रियेतील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या सरमिसळीकरण प्रक्रिया रविवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात भाजपच्या पंकजा मुंडे(Pankaja Munde), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यासह एकूण 41 उमेदवार रिंगणात होते. पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली आहे. सुरुवातीला बोगस मतदानावरुन आरोप करणाऱ्या बजरंग सोनवणे यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत नको, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने माहिती दिली.

बीड लोकसभेची(Beed Lok Sabha Constituency) मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 4 जून रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरु होईल. विधानसभा मतदारसंघ निहाय सहा कक्षांत प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होईल. टपाली मतपत्रिका मोजणीसाठी स्वतंत्र मोजणी कक्षात दहा प्रतिनिधी असतील. प्रत्येक उमदेवारास 94 मतमोजणी प्रतिनिधींची नियुक्ती करता येईल. यासाठी शुक्रवार (ता. 31) पर्यंत अर्ज करता येतील.

प्रत्येक EVM मशीन मधील मतमोजणीची प्रक्रिया मतमोजणी प्रतिनिधींच्या समोर होईल. मतमोजणी प्रक्रियेसाठी दोन मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

त्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्रत्येक मतमोजणी कक्षामध्ये 16 सुक्ष्म निरीक्षकांची नेमणूक असेल. प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक व केंद्र शासनाच्या सेवेतील एक सुक्ष्म निरीक्षक असेल. या सर्व मतमोजणी अधिकारी - कर्मचाऱ्यांचे द्वितीय सरमिसळीकरण निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत 3 जून रोजी तर तिसरे सरमिसळीकरण चार जून रोजीा सकाळी पाच वाजता होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT