Haribhau Bagde : बागडे नाना फुलंब्रीतुन रावसाहेब दानवेंना मताधिक्याचा 'बुस्टर' देणार का?

Phulumbri Assembly Constituency : फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या कामगिरीकडे भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष असणार आहे.
Haribhau Bagde and Danve
Haribhau Bagde and DanveSarakarnama

Jalna Loksabha Election 2024 : लोकसभेच्या जालना मतदारसंघात येणाऱ्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना प्रतिनिधित्व करत आहेत. 2014-2019 अशा सलग दोन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. पहिल्यावेळी बागडे नाना काठावर पास झाले, काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा अवघ्या 3611 मतांनी पराभव झाला होता. तर त्यापुढच्या म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्रीत बागडेंचे मताधिक्य तीन हजारांवरून पंधरा हजाराच्या पुढे गेले.

या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी बागडेंना(Haribhau Bagde) कडवी झुंज दिल्याचे दिसून आले. आता तेच कल्याण काळे लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आधीच या लढतीकडे 2009 मध्ये झालेल्या अटीतटीच्या झुंजीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. काळे यांनी तेव्हा दानवेंना जोरदार टक्कर दिली होती, पण त्यांचा अवघ्या आठ हजार मतांनी पराभव झाला होता. 2024 मध्ये काळे-दानवे पुन्हा पंधरा वर्षांनी आमने-सामने आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Haribhau Bagde and Danve
Sanjay Raut News : "4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल", असं कोण म्हणालं?

13 मे रोजी झालेल्या मतदानानंतरच्या आकडेमोडीत मतदारांचा कल कल्याण काळे यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. परंतु रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, लोकसभा निवडणुकीतील सातत्य पाहता, ते चमत्कार घडवतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. अशावेळी भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघाचा विचार केला तर फुलंब्रीतून बागडे नाना रावसाहेब दानवेंना मताधिक्याचा बुस्टर डोस देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बागडे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत फुलंब्रीतून मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. अशावेळी लोकसभेला कमी-जास्त झाले तर थेट उमेदवारीवरच गंडांतर येऊ शकते. त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या कामगिरीकडे भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष असणार आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघ(Phulumbri Assembly Constituency) हा फुलंब्री तालुका, छत्रपती संभाजीनगर तालुका व छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिकेचे दहा वॉर्ड असा विभागलेला आहे.

Haribhau Bagde and Danve
Sambhajinagar Lok Sabha Constituency : काठावर पास झालेले आमदार सावे, जयस्वाल लोकसभेला मताधिक्य कसे मिळवून देणार?

हरिभाऊ बागडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंजून काढला होता. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा मानस बागडे यांचा आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात बागडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र देऊन आपापल्या गावातून जास्तीत जास्त मतदान करून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना लीड देण्याचे आवाहन केले होते.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात 2004 ते 2014 या दहा वर्षात माजी आमदार डॉ. कल्याण काळे(Kalyan Kale) यांचे वर्चस्व होते. मात्र मागील दहा वर्षापासून हा मतदारसंघ व तालुक्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. या सगळ्या बाजूंचा विचार करता फुलंब्रीतून रावसाहेब दानवेंना लिफ्ट मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com