Beed Collector Deepa Mudhol sarkarnama
मराठवाडा

Beed loksabha news : बोगस मतदान अहवाल आयोगाकडे; कोणताही गैरप्रकार नाही : दीपा मुधोळ

Deepa Mudhol बीड जिल्ह्यात कुठेही बोगस मतदान झालं नसल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली आहे

Umesh Bambare-Patil

Beed News : बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही गैरप्रकार झालेला नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तक्रार झाली होती, त्याची चौकशी करून त्याचा अहवाल आयोगाला पाठवला आहे, बीड जिल्ह्यात कुठेही बोगस मतदान झालं नसल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली आहे.

राज्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत मतदानादिवशी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. विशेष म्हणजे मागच्या आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारचे मतदान केंद्रावरचे व्हिडिओ हे सोशल मीडियामध्ये फिरत होते. याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

तसेच आमदार रोहित पवार यांनी ही दोन व्हिडिओ ट्विट करत या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच निवडणूक आयोग या प्रकरणी चौकशी करणार की केवळ विरोधकांवरच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

आमदार रोहित पवार यांच्या आरोपावर पंकजा मुंडे म्हणाल्या,ज्याची कोणाची तक्रार आहे, त्यांनी निवडणूक आयोगाकडे करावी. असं घडलं असतं तर मी इथे उभी नसते. सलग पाचवी निवडणूक आम्ही हाताळतो आहोत. आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांनी 15 आमदार लावले होते. त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं हे लक्षण आहे.

त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी चौकशी केली. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, त्यांनी या प्रकरणाचा अहवाल पाठवून दिला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात कुठेही बोगस मतदान झालं नसल्याची माहिती, यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT