Beed Loksabha Election : बीड जिल्ह्यात बूथ कॅप्चरिंग, बोगस मतदान नाही; जिल्हा प्रशासनाचा अहवाल!

Bajrang Sonawane : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला होता.
Beed Loksabha
Beed Loksabha Sarkarnama

Beed Loksabha Election Voting : लोकसभा निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यात बूथ कॅप्चरिंग, बोगस मतदानाच्या घटना घडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केल्यानंतर या पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही व्हिडिओ पोस्ट करत तसेच आरोप केले. मात्र, जिल्ह्यात बूथ कॅप्चरिंग, बोगस मतदान झाले नसल्याचा अहवाल जिल्हा निवडणुक विभागाने निवडणुक आयोगाला सोमवारी पाठविला आहे.

विशिष्ट वेळेत भरपूर मतदान होणे, इतर ठिकाणच्या तुलनेत अधिक मतदान होणे, मतदान केंद्राध्यक्षांकडून बुथ कॅप्चर झाले किंवा बोगस मतदान झाले याची नोंद झाल्यानंतर बोगस मतदान झाल्याचे मानले जाते. असे प्रकार आढळले नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Beed Loksabha
Beed Loksabha Election : पंतप्रधान मोदी, उदयनराजेंनी सभा घेतलेल्या 'या' मतदार संघातून 'लीड' कोणाला मिळणार?

आष्टी तालुक्यातील एका बुथवर शंभर टक्क्यांच्या आसपास मतदान झाले असले तरी या बुथावर केवळ ४०० मतदान आहे. कुठल्याही केंद्राध्यक्षांनी बुथ ताब्यात घेतल्याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद केलेला नाही वा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना तसे कळविलेले नाही. त्यामुळे बोगस मतदान व बुथ ताब्यात घेण्याचा प्रकार घडला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच, एका व्हायरल व्हिडीओत बबन गित्ते केंद्रातील कर्मचाऱ्यांना बोगस मतदानाबाबत विचारत असले तरी या व्हीडीओत देखील बोगस मतदान दिसत नाही. यासह असा बोगस मतदान दिसणारी व बुथ कॅप्चर झाल्याचे स्पष्ट होणारी बाब व व्हिडीओ नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी इंजेगाव, सारडगांव, धर्मापूरी, डि्रगस, नाथ्रा, कौडगाव, साबळा, जिरेवाडी, वालेवाडी व कन्हेरवाडी गावातील बुथ क्रमांक १८८, १८९, १३२, १६१ तसेच केज तालुक्यातील देवगाव, लाडेगाव, माजलगाव मधील गोविंदवाडी, त्याच बरोबर धारुरमधील सोनीमोहा, पिंपरवाडा, मैंदवाडी व चाडगांव, आष्टी मतदार संघातील वाली व वाघीरा या गावांतील बुथ ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा आरोप केला होता.

Beed Loksabha
Beed Loksabha Election : परळीतील इंजेगावात बुथ ताब्यात घेत बोगस मतदान झाल्याची तक्रार दाखल!

यानंतर आता रोहित पवारांनी देखील बोगस मतदानाचे व्हिडीओ पोस्ट करुन बुथ कॅप्चर करुन बोगस मतदानाचा आरोप केला आहे. असेच प्रकार सुरु राहीले तर भविष्यात महाराष्ट्राचा बिहार व उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी आपल्या ‘एक्स’ सोशल मिडीया अकाऊंटवर म्हटले होते.

बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नसल्याचा गंभीर आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com