Beed Lok Sabha Analysis : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीड लोकसभा निवडणुकीच्या विजयाचे 'असे' आहे गणित..

Beed Lok Sabha Constituency : बीडमध्ये गतवेळेपेक्षा मतदान पाच टक्क्यांनी वाढून ते ७०.९१ टक्के मतदान झाले. हीच मतदानाची वाढ राजकीय वर्तुळातील जाणकारांना संभ्रमात टाकत आहे. हे अधिक मतदान कोणाच्या पारड्यात पडते यावरच निकालाचे भवितव्य असल्याचे बोलले जाते.
Pankaja Munde, Bajrang Sonwane
Pankaja Munde, Bajrang SonwaneSarkarnama

Beed Political News : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात रंगतदार आणि रोमहर्षक लढत झाली. आता झालेल्या मतदानात मतदारसंघनिहाय कोणाला व किती मताधिक्क्य मिळणार, याची आकडेमोड दोन्ही वर्तुळांत सुरू आहे. मुंडेंचे होमपिच असलेल्या परळी व आष्टी मतदारसंघात ‘बंपर’ लिड मिळून पंकजा मुंडे विजयी होतील, असे भाजपच्या वतीने सांगितले जाते. तर, बजरंग सोनवणे यांच्या गोटात बीड, गेवराई, माजलगाव आणि केजच्या मताधिक्क्यावर भिस्त असल्याचे दिसून येत आहे. Beed Lok Sabha Analysis

बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, शरद पवार Sharad Pawar गटाचे बजरंग सोनवणे, वंचितचे अशोक हिंगे यांच्यासह इतर ४१ उमेदवार रिंगणात होते. मात्र, पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यातच थेट लढत झाली. बीडमध्ये १३ मे रोजी मतदान झाले. बीड व परळी मतदारसंघातील काही बुथवर उशिरापर्यंत मतदान झाले. बीडमध्ये गतवेळेपेक्षा मतदान पाच टक्क्यांनी वाढून ते ७०.९१ टक्के मतदान झाले. हीच मतदानाची वाढ राजकीय वर्तुळातील जाणकारांना संभ्रमात टाकत आहे. हे अधिक मतदान कोणाच्या पारड्यात पडते यावरच निकालाचे भवितव्य असल्याचे बोलले जाते. Pankaja Munde Vs Bajrang Sonwane

दरम्यान, मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे Pritam Munde व राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सर्वच विधानसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेंना आघाडी मिळाली होती. त्यात परळी व आष्टीने बाजी मारली होती. गत वेळी बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम करणारे धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, नमिता मुंदडा यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत. एकूणच भाजपच्या ताकदीला राष्ट्रवादीच्या ताकदीची जोड मिळाली. एक मंत्री, एक खासदार, पाच आमदारांसह दिग्गज नेत्यांची फळी पंकजा मुंडे यांच्यासह काम करत होती. तर बजरंग सोनवणे यांच्याकडे आमदार म्हणून एकमेव संदीप क्षीरसागर होते. तर, पुन्हा काही माजी आमदार व दुसऱ्या व दुसऱ्या फळीतील नेते होते.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस आमदाराच्या हवाल्याने ठाकरेंच्या उमेदवाराचा अडीच लाख मतांनी जिंकण्याचा दावा...

आता मतदानानंतर विधानसभा निहाय आकडेमोड केली जात आहे. पण, दोन्ही बाजूंच्या निकालाचे घोडे परळी, आष्टीवर येऊन थांबत आहे. सोनवणे यांना बीड, गेवराई व माजलगाव या तीन विधानसभा मतदारसंघातून मताधिक्क्य मिळेल, अशी दोन्ही बाजूंनी खात्री आहे. तर, स्वत:चे होमपिच असलेले बजरंग सोनवणे Bajrang Sonwane केजमधून मागच्या वेळीची १८ हजार मतांची भाजपचे मताधिक्क्य कापून बरोबरीत येतात की मताधिक्क्य घेतात याकडे लक्ष लागले आहे. सोनवणेंना मताधिक्य मिळू नये यासाठी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा Namita Mudanda यांच्यासह रमेशराव आडसकरांनी खिंड लढविली.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Uddhav Thackray News : नाही.. नाही म्हणत शिंदे गटात जाऊन उमेदवारीही मिळवलेल्या वायकरांवर ठाकरेंचा तिखट वार

बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अनिल जगताप, सचिन मुळूक, कुंडलिक खांडे हे तीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच राष्ट्रवादीचे डॉ. योगेश क्षीरसागर, बबन गवते आदी मंडळी पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्यासाठी खिंड लढवत होती. मात्र, तरीही या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणेंना मताधिक्य असेल हा शरद पवार गटात विश्वास आहे. ही बाब भाजपची मंडळीही मान्य करताना दिसत आहेत. मात्र, दोघांच्या आकड्यांवरुन १०-१५ हजार मतांची तफावत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीची मदार आमदार संदीप क्षीरसागरांवर होती. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील विश्वासू कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणी दिलेला ‘मेसेज’ची ताकद कोणाच्या पारड्यात पडते हे देखील महत्वाचे आहे. त्यावरही मताधिक्य अवलंबून आहे. बीड मतदारसंघातील हुक्कांच्या भागात मतांचा टक्का वाढविण्यात राष्ट्रवादीला अपयश आले तेही तितकेच खरे.

गेवराईत पंकजा मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी अमरसिंह पंडित व भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी खिंड लढविली. या मतदारसंघातून सोनवणे यांच्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित काम करत होते. या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळेल, असा दोन्ही बाजूंचा अंदाज आहे. फक्त राष्ट्रवादीची अपेक्षा अधिक व भाजपकडून कमी लिड मिळेल, असा प्रतिवाद आहे. माजलगावला पंकजा मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे रमेश आडसकर, मोहन जगताप यांच्यासह दिग्गजांची फळी रिंगणात होती. तर, बजरंग सोनवणे यांच्यासाठी माजी आमदार राधाकृष्ण होके, माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस आदी मंडळी प्रचारात होती. येथे बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळेल, असा राष्ट्रवादी नेत्यांना विश्वास आहे तर भाजपलाही हे मान्य आहे. मात्र, दोघांच्या आकड्यांत तफावत आहे.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Uddhav Thackeray Vs BJP : मतदानाच्या काही तास आधी ठाकरेंचं मुंबईत 'मास्टर कार्ड'; पूनम महाजनांवरून भाजप 'बॅकफूट'वर ?

आता दोघांचे घोडे परळी व आष्टी मतदारसंघावर येऊन ठेपत आहे. परळी हे मुंडेंचे होमपिच आहे. मागच्या वेळी धनंजय मुंडे विरोधात असतानाही प्रीतम मुंडेंना ७० हजारांच्या आसपास मताधिक्य होते. आता दोन्ही मुंडे एकत्र आल्याने या ठिकाणी भाजपच्या पंकजा मुंडेंना बंपर लिड मिळेल, असे मानले जाते. या मतदारसंघात मुंडेंनी ताकदीने यंत्रणा राबवली तसेच बोगस मतदानाचाही आरोप आहे. बबन गित्ते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, फुलचंद कराड, सुदामती गुट्टे, माधव जाधव आदींनी या ठिकाणी बजरंग सोनवणेंसाठी खिंड लढविली. मात्र, तुलनेने राष्ट्रवादीला या मतदारसंघात बुथ यंत्रणा राबवण्यात म्हणावे तेवढे यश आले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आष्टीत पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस Suresh Dhas, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे व भाजपचे माजी आमदार भिमराव धोंडे असे दिग्गज नेते पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करत होते. तर, सोनवणेंची धुरा माजी आमदार साहेबराव दरेकरांसह इतर नेत्यांवर होती. या मतदारसंघात देखील सोनवणेंची यंत्रणा काहीशी कमकुवत असल्याचे सांगीतले जाते. त्यासह धस, आजबे, धोंडे यांच्या ताकदीमुळे आष्टीतून पंकजा मुंडे यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा भाजपला विश्वास आहे. तर, भाजपला मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
BJP Vs Shivsena News: ठाकरेंची फडणवीसांवरील 'ती' टीका भाजपला चांगलीच झोंबली, आशिष शेलार म्हणाले...

मागच्या निवडणुकीत या मतदारसंघातून प्रीतम मुंडेंना ७८ हजारांचे व जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. आता आष्टी व परळी मतदारसंघातून भाजपला मिळणारा मताधिक्याच्या आकड्यावर बीड, माजलगाव व गेवराईचे राष्ट्रवादीचे मताधिक्य घटेल व भाजप विजयी होईल, असा पंकजा मुंडे समर्थकांना विश्वास आहे. तर, बीड, माजलगाव, गेवराई व केज मतदारसंघातील मताधिक्य परळी व आष्टीला कटणार नाही, आणि बजरंग सोनवणेंचाच विजय होईल, असा अंदाज राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे. एकूणच दोघांचे घोडे परळी, आष्टीवर येऊन ठेपत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Nilesh Lanke News : नीलेश लंकेंच्या पदाधिकाऱ्यांचे 'ईव्हीएम'वर लक्ष, गोदामाभोवती ठोकला तळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com