Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil, Pritam Munde sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha News : भुजबळांवर टीका करत जरांगे पाटलांनी काढलं प्रीतम मुंडे यांचे सासर...

Manoj Jarange Patil : महाविकास आघाडीला नाही, महायुतीला नाही, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. आपली ताकत मतात दाखवा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं.

Umesh Bambare-Patil

Beed Loksabha News : मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर आता महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मुंडे कुटुंबासह समाज असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही हाय किती, असे म्हणत जरांगे पाटलांनी मराठ्यांची बीड जिल्ह्यातील मतदाराची संख्या सांगितली. तसेच यावेळी छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आणि उदाहरण देत प्रीतम मुंडेंचं सासर देखील जरांगे पाटलांनी काढलंय.

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आयोजित सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, ती मुलगी तिथं उभा राहिली म्हणून भुजबळांच्या पोटात काय दुखायलय. तीच सासर तिथं आहे.

त्या खासदारांनी धनगराच्या आरक्षणावर बोलल्यात का, असा प्रश्न करुन मात्र, आता त्यांना धनगर लागतो. मराठा विरोधात असता तर गोपीनाथ मुंडे साहेबांना एवढ्या मोठ्या मतांनी निवडून दिलं नसतं. यांच्या मुलीला दोनदा खासदार केलं.

एवढं करून जर तुम्ही मराठ्यांना विरोधक समजत असाल तर मराठे कसं निवडून देतील तुम्हाला, असा प्रश्न करुन जरांगे पाटील म्हणाले, अरं तुम्ही हाय तरी किती? आम्ही सहा - साडेसहा लाख आहोत इथ एकटेच. त्यात साडेतीन लाख मुस्लिम समाज आहे.

आम्ही जातीवादी असतो तर गोपीनाथ मुंडे साहेबांना निवडून दिलं नसतं. दुसऱ्या जिल्ह्यातील बबनराव ढाकणे यांना निवडून दिलं ना, तीन वेळा. केशरकाकूंना खासदार केलं नसतं. हमेशा क्षीरसागर घराण्याला मराठा समाज निवडून देतो.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

आता तुम्हाला काय करायचे ते करा आपला पाठिंबा कोणालाच नाही. महाविकास आघाडीला नाही, महायुतीला नाही, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण असं पाडा की खाली गेल्यानंतर वर आलाच नाही पाहिजे. आपली ताकत मतात दाखवा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT