Bajrang Sonwane : गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत बजरंग सोनवणेंनी मुंडे बंधू-भगिनींवर डागली टीकेची तोफ

Pankaja Munde - Dhananjay Munde : बजरंग सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी बजरंग सोनवणे यांनी विविध देव देवतांसह शहरातील दर्ग्यांचे दर्शन घेतले. तसेच,दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Pankaja Munde, Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Pankaja Munde, Dhananjay Munde, Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : पालकमंत्री महोदय तुम्ही आमची औकात काढू नका. आमची औकात काय आहे, हे आम्ही दाखवून दिलेले आहे. दिवंगत गोपीनाथराव मुंडेंनी राज्यातील २५ साखर कारखाने यशस्वीपणे चालविले. तुम्ही बहीण - भावांनी हे कारखाने बंद केले. त्यांनी काढलेले तीन साखर कारखाने देखील बंद पाडले, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी लगावला.

बजरंग सोनवणे Bajrang Sonwane यांनी सोमवारी (ता. २२) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी बजरंग सोनवणे यांनी विविध देव देवतांसह शहरातील दर्ग्यांचे दर्शन घेतले. तसेच, दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आघाडीच्या सभेत बजरंग सोनवणे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

बजरंग सोनवणे म्हणाले, मी एक सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला व्यक्ती दोन कारखाने यशस्वीपणे चालवतो. मराठवाड्यात विक्रमी भाव देत आहे ही आमची औकात आहे. तसेच भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता नेते नव्हे तर जनता आमच्या सोबत असून भाजप सरकार हे सत्तेचा पाचपट गैरवापर करीत आहे. निवडणुक ही गैरविश्वासाच्या मुद्द्यावर लढविली जात आहे. धनंजय मुंडे Dhananjay Munde आणि अजित पवार चार महिन्या नंतर निवडणूक संपल्या नंतर शरदचंद्र पवार यांच्या पक्षात येतील. परंतु त्यांना पक्षात घ्यायचे किंवा नाही हे आम्ही ठरवू, असेही बजरंग सोनवणे म्हणाले. अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्ग २५६ किलोमीटरचा असून १५ वर्षां मध्ये केवळ ९९ किलोमीटरचे काम पूर्ण झालेलं आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी २५ वर्षे लागतील. म्हणजे किमान दोन पिढ्या तरी हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार नाही. परंतु मी निवडून आल्या नंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये ही काम पूर्णत्वाकडे घेऊन जाईन.

Pankaja Munde, Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Nilam Gorhe : उठा जरा..! नीलम गोऱ्हेंच्या पत्रकार परिषदेत राजू वाघमारेंना डुलकी अन् पुढे...

खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे , शिवसेना उबाठा किशोर पोतदार, आमदार संदीप क्षीरसागर, महेबूब शेख, पृथ्वीराज साठे, बबन गित्ते, फुलचंद कराड, नरेंद्र काळे, संगीता चव्हाण, अजिंक्य चांदणे, धम्मपाल कांडेकर, साहेबराव दरेकर, बदामराव पंडित, ईश्वर मुंडे, रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, मोहन गुंड, ॲड. गोले, उषा दराडे, सुदामती गुट्टे, शिवराज बांगर, सुशीला मोराळे, पूजा मोरे, विजय साळवे, दीपक केदार, नामदेव चव्हाण, गणेश वरेकर, सय्यद सलीम, सुनील धांडे, सिराज देशमुख, अजय बुरांडे , हेमा पिंपळे , शिवाजीराव कांबळे, दादासाहेब मुंडे आदींची उपस्थिती होती.

(Edited by Sunil Dhumal)

Pankaja Munde, Dhananjay Munde, Bajrang Sonwane
Vishal Patil Rebel : सांगलीच्या रक्तात बंड; विशाल पाटलांनी काँग्रेस अन् पैलवानाचंही टेन्शन वाढवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com