BJP worker attacked sarkarnama
मराठवाडा

Beed BJP Office Murder : सक्रिय कार्यकर्त्यावर भाजप कार्यालयासमोरच कोयत्यानं सपासप वार; मंत्री बोर्डीकरांची दोन दिवसांपूर्वीच घेतली होती भेट

BJP Worker Brutally Attacked Outside Party Office : भाजप कार्यालयासमोर कोयत्याने सपासप वार करत सक्रिय कार्यकर्त्याचा खून झाल्याने बीड हादरलं आहे.

Pradeep Pendhare

Beed Murder News : बीडमधील राजकीय गुन्हेगारीमुळे तिथली रक्तरंजित गुन्हेगारी थांबायला तयार नाही. संतोष देशमुख हे मस्साजोगचे गावचे सरपंच होते. तसंचे भाजपचे ते बूथ प्रमुख होते. त्यांच्या हत्येनंतर बीडमध्ये खुनांचे सत्र सुरू आहेत.

आता बीडच्या माजलगावमधील भाजप कार्यालयासमोर भर दिवसा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता तथा आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे याचा खून झाला आहे. कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले.

नारायण शंकर फपाळ याने भर दिवसा हे कृत्य केलं असून, घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होतं आहेत. विशेष म्हणजे, मयत बाबासाहेब आगे दोन दिवसांपूर्वी भाजप मंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेतली होती.

बीडच्या (BEED) माजलगाव शहरात भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. हत्या केल्यानंतर नारायण फपाळ हा आरोपी स्वतः पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भर वस्तीत भाजपचं कार्यालय आहे. तिथं कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही हत्येची (Crime) घटना घडल्याने दहशत पसरली आहे. बीडमधील शांतता-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

आरोप नारायण फपाळ हा रागाराने आगे यांच्यावर कोयत्याने वार करत होता, त्यावेळी परिसरात दहशत निर्माण झाली होती. काहीशी पळापळ झाली होती. हा सर्व प्रकार काहींनी व्हिडिओमध्ये कैद केला असून, हे व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होऊ लागले आहेत.

मयत बाबासाहेब आगे हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत. भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. त्या कार्यालयाच्या समोरच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी नारायण फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. बाबासाहेब आगे समोर येताच, फपाळ याने त्यांच्यावर सपासप वार केले. फपाळ याने माजलगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्येची माहिती दिली.

मयत बाबासाहेब आगे हे दोन दिवसापूर्वी मंत्री मेघना बोर्डीकर यांना देखील भेटला होता. मंत्री बोर्डीकर हे बीड दौऱ्यावर असताना, त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता म्हणून बाबासाहेब आगे पुढे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT