Maharashtra Politics : 'मविआ'ला डावलून महायुतीविरोधात 'हे' तीन बडे नेते रान पेटवणार; 'स्थानिक'च्या निवडणुकीपूर्वी नवे राजकीय समीकरण जुळणार!

Third Front in Maharashtra Politics : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत परिवर्तन महाशक्ती आघाडीचा प्रयोग देखील पाहायला मिळाला. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 15 Apr : विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. सध्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतापद देखील देण्यात आलेलं नाही.

त्यामुळे कुठंतरी विरोधकांची ताकद कमी झाल्याचं बोललं जात असतानाच विरोधकांची कमी झालेली स्पेस घेण्यासाठी महाराष्ट्रातील 3 मातब्बर नेते एकत्रित येणार आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये महायुती, महाविकास आघाडीनंतर वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रातील राजकारणात पाहायला मिळाला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत परिवर्तन महाशक्ती आघाडीचा प्रयोग देखील पाहायला मिळाला. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Politics
Kolhapur politics : समरजीत घाटगेंचा राग फडणवीसांच्या डोक्यातून जाईना...; संजय घाटगेंसाठी उघडलं भाजपचं दार

आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते एकत्र येणार आहेत. पुण्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची रविवारी एकत्रित 'युवा संघर्ष निर्धार परिषद होणार आहे.

'खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.!' या टॅगलाईन खाली "युवा संघर्ष निर्धार परिषद 2025" होणार आहे. या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक वेगळं समीकरण महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics
Nitesh Rane : कोकणात दोन पक्ष, दोन भावांसह मंत्र्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची स्पर्धा

त्यामुळे आगामी काळामध्ये हे तिन्ही नेते एकत्रित येत एक नवीन आघाडी तयार करणार असल्याचे बोलले जात आहे. याआधीही तिसऱ्या आघाडीचे प्रयोग अनेकदा झाले आहेत, परंतु त्याला यश आलेलं पाहायला मिळाले नाही.

त्यामुळे आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या या समीकरणाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com