Beed Municipal Council Election 2025 Sarkarnama
मराठवाडा

Beed News : बीडमध्ये सामाजिक गणित मांडत नगराध्यक्षपदांच्या उमेदवाऱ्या! चुरस वाढली

Beed Municipal Council Candidate : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगर पालिकेत सभापती व नगरसेवक पदाचा अनुभव असलेल्या स्मीता वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे.

Datta Deshmukh

  1. बीडमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर सर्व पक्षांकडून सोशल इंजिनिअरिंगचा मोठा वापर होत असून जातीय समीकरणे सर्वात मोठा निर्णायक घटक ठरत आहेत.

  2. विविध समाजसमूहांच्या मताधिक्यावर आधारित उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.

  3. नगरपालिकेच्या सत्तेवर कब्जा मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष मतदारधार, जातीय संतुलन आणि स्थानिक नेत्यांचा प्रभाव या तिन्ही गोष्टींची जुळवाजुळव करत आहे.

Local Body Election News : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवड करताना सर्वच पक्षांनी सामाजिक आणि जातीय समिकरणे मांडत नगराध्यक्षपदांचे उमेदवार निवडले. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपने एकाचढ एक उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. एमआयएमसह अपक्षही रिंगणात आहेत.

बीडचे नगराध्यक्षपद अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव आहे. तरीही इतर समाज सोबत येतील, असे गणिते मांडत उमेदवारांची निवड करण्यात आली. मागच्या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली होती. मात्र, नगरसेवकांचे बहुमत त्यांना जिंकता आले नव्हते. पहिल्याच निवडणुकीत मागच्या वेळी एमआयएमनेही चांगले यश मिळविले. मात्र, निकालापासूनच पक्षाला फाटाफुटीची बाधा निर्माण झाली.

याच पक्षातील काही नगरसेवकांना गळाला लावून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या तत्कालिन काकू - नाना आघाडीने उपनगराध्यक्षपद मिळविले. दरम्यान, यावेळची निवडणुक आणखीच रंगतदार होत आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच भाजपकडून सर्व उमेदवार रिंगणात आहेत. शहराचे सामाजिक आणि जातीय मतदारांच्या गणितानुसार उमेदवारांच्या निवडी तिनही पक्षाने केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगर पालिकेत सभापती व नगरसेवक पदाचा अनुभव असलेल्या स्मीता वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती विष्णू वाघमारे 20 वर्षे आणि त्या स्वत: 10 वर्षे नगरसेवक राहीलेल्या आहेत. सर्वच घटकांत उठबस आणि मृदु स्वभाव ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांनी सभापती म्हणूनही काम केलेले आहे.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसने निवृत्त महसूल अधिकारी प्रेमलता पारवे यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांचे वडिल मनोहर वंजारे दलित मित्र होते. तर, जावई पत्रकार मुजिब शेख यांचा मुस्लिम समाजात चांगला राबता आहे. असे दुहेरी समिकरण डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. ऐनवेळी रिंगणात उतरलेल्या भाजपने डॉक्टर महिलेला उमेदवारी दिली आहे.

केज तालुक्यातील मुळ रहिवाशी पण बीडला अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात असलेले घुमरे दाम्पत्यापैकी डॉ. ज्योती घुंबरे बधीरीकरण तज्ज्ञ तर पती डॉ. रवींद्र घुंबरे- नाक - घसा तज्ज्ञ आहेत. डॉ. ज्योती घुंबरे यांना रिंगणात उतरविताना भाजपने उच्चशिक्षीत व चर्मकार असे दुहेरी गणित आखले आहे. एमआयएमनेही मुस्लिम - दलित काँबीनेशन जुळविले आहे. आता, मतदारांना कोणता उमेदवार आवडतो आणि कोणता पक्ष भावतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

FAQs

1. बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सोशल इंजिनिअरिंग का महत्वाचं ठरलं आहे?
कारण विविध समाजसमूहांचा मतदानावर मोठा प्रभाव असून पक्षांना जिंकण्यासाठी योग्य जातीय संतुलन साधणारा उमेदवार हवा असतो.

2. कोणते पक्ष सोशल इंजिनिअरिंग सर्वाधिक वापरत आहेत?
भाजप, राष्ट्रवादी (दोन्ही गट), काँग्रेससह जवळजवळ सर्वच पक्ष सोशल इंजिनिअरिंगवर भर देत आहेत.

3. उमेदवारी निश्चित करताना कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात?
मतदारसंख्या, जातीय समीकरण, पक्षातील अंतर्गत गटबाजी, स्थानिक नेत्यांचा प्रभाव आणि भावी राजकीय शक्यता.

4. सोशल इंजिनिअरिंगमुळे कोणत्या पातळीवर नाराजी दिसते?
अनेक वरिष्ठ आणि इच्छुक नेते बाजूला पडल्याने पक्षांतर्गत असंतोष आणि बंडखोरीची शक्यता वाढते.

5. बीडचे अंतिम राजकीय समीकरण कशावर ठरेल?
उमेदवाराचा समाजातील स्वीकार, त्याची प्रतिमा, स्थानिक जनाधार आणि पक्षाचे निवडणूक व्यवस्थापन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT