Yogesh Kshirsagar : डॉ. क्षीरसागरांच्या प्रवेशाने बीडमध्ये भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ; 'स्थानिक'च्या निवडणुकांवर होणार परिणाम

Beed political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला ताकद मिळणार हे निश्‍चीत मानले जात आहे.
yogesh kshirsagar
yogesh kshirsagar BJP
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच 2012च्या बीड नगरपालिका निवडणुकीत शुन्य आणि 2017 च्या निवडणुकीत 50 पैकी एक जागा जिंकणाऱ्या भाजपला त्यावेळेसच्या निवडणुकीत दुर ठेवूनच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये तयारी सुरु केली होती. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा नारा देण्याशिवाय पक्षासमोर पर्याय नव्हता. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला ताकद मिळणार हे निश्‍चीत मानले जात आहे.

बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी धारुर, माजलगाव व गेवराईत भाजपने स्वतंत्र लढण्याची पूर्णपणे तयारी करुन ताकदही जमविलेली आहे. अंबाजोगाईत मात्र पक्षाचेच नेते चिन्हाऐवजी आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. परळीत राष्ट्रवादी -भाजप युतीबाबत बोलणी सुरु आहे. बीडमध्ये मात्र भाजप पक्ष एकटा आणि नेहमीप्रमाणे दुबळा होता. 2012 च्या निवडणुकीत शुन्य आणि मागच्या वेळी एक नगरसेवकपद जिंकणाऱ्या भाजपला 50 उमेदवारही उभा करता आले नव्हते.

yogesh kshirsagar
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा उद्रेक; जुन्नरच्या नगराध्यक्षपद उमेदवारीचा वाद ‘मातोश्री’वर, संपर्कप्रमुखांनी बोलावली बैठक

आगामी काळात होत असलेल्या निवडणुका डोळ्यसमोर ठेवून जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी बुथ कमिट्यांच्या माध्यमातून बांधणी केली होती. संघटन काही प्रमाणात वाढलेले असले तरी पक्षाकडे नगरपालिकेचे 52 नगरसेवक पदाच्या उमेदवारांची वानवा होती.

yogesh kshirsagar
BJP Election Strategy : बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय; नगराध्यक्षपदाचे उमेदवार ‘या दिवशी’ जाहीर होणार

दरम्यान, या काळात मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याशी डॉ. क्षीरसागरांच्या भेटी वाढल्याने सुरुवातीला डॉ. क्षीरसागर व भाजप यांच्यात आघाडीची शक्यता मानली जात होती. मात्र, त्यांनी शेवटच्या टप्प्यात राजीनामा देत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

yogesh kshirsagar
NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा, पहिल्याच दिवशी अर्ज संपले, 10 हजार घेऊन...

क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपला (Bjp) बीडमध्ये चांगला चेहरा आणि बळ मिळण्याची शक्यता मानली जात आहे. पक्षाचे काही व डॉ. क्षीरसागरांचे अशी गोळाबेरीज करुन पक्ष सर्व जागा लढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता बीड शहरात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

yogesh kshirsagar
Shivsena-NCP SP Yuti : सोलापुरात नवे राजकीय समीकरण; शिंदेसेना अन्‌ पवारांच्या राष्ट्रवादीची युती, मोहिते पाटील-कोकाटेंचा पुढाकार

बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे, विशेषतः बीड शहर आणि आसपासच्या भागामध्ये. डॉ. योगेश क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे भाजपला या भागात विशिष्ट मताधार जोडण्यास मदत होणार आहे.

yogesh kshirsagar
Ajit Pawar Politic's : अजितदादांनी सांगूनही प्रफुल पटेलांनी ऐकलं नाही...बिहारमध्ये उमेदवार दिले अन् राष्ट्रवादी तोंडावर पडली!

यावेळी बीडमध्ये भाजप नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व 52 जागा ताकदीने लढविणार आहोत. पुर्वीसारखे चित्र या निवडणुकीत निश्‍चित नसणार आहे, असे बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले.

yogesh kshirsagar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना मोठा झटका; बीडच्या राजकारणात फेरबदल, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com