Beed News : आमदार संदीप क्षीरसागर यांच्या 'पीए'चा शिवसेनेत प्रवेश अन् राजूरी गटातून जिल्हा परिषदही लढवणार!

MLA Sandip Kshirsagars PA In Politics : विशेष म्हणजे त्यांनी ज्या आमदारांना सोडले आहे, त्या संदीप क्षीरसागर यांचे गाव आणि त्यांची राजकिय कारकिर्द सुरु झालेल्या नवगण राजूरी जिल्हा परिषद गटातूनच ते नशिब आजमवणार आहेत.
MLA Sandip Kshirsagars PA Contest  In ZP Election News Beed
MLA Sandip Kshirsagars PA Contest In ZP Election News BeedSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएने त्याच जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे जिथून क्षीरसागरांनी राजकारणाची सुरुवात केली होती.

  2. या निर्णयामुळे बीड जिल्हा परिषद निवडणुकीत उत्सुकता निर्माण झाली असून स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे.

  3. क्षीरसागर गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे, कारण हा गट त्यांच्या राजकीय इतिहासाशी जोडलेला आहे.

ZP Election 2025 : राजकारण्यांचे दैनंदिन कामकाज साभाळतांना एखाद्या आमदाराच्या पीएने थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे प्रमाण तसे बोटावर मोजण्या इतकचे. पण आताही संख्या हळूहळू वाढू लागली आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक सतीश शेळके यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता लेगच त्यांनी क्षीरसागर यांचे मुळ गाव असलेल्या राजूरी गटातूनच जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचीही तयारी सुरू केली आहे.

आमदारांचे पीए राजकारणाच्या आखाड्यात उतरणार म्हटल्यावर याची चर्चा जिल्हाभरात झाली नाही तर नवलच. एखाद्या नेत्याचा वा आमदारांचा पीए प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतरल्याचे फारसे घडत नाही. फार तर संबंधीत आमदारांचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या आमदारांकडे काम करतात. मात्र, बीडमध्ये स्वीय्य सहाय्यक असलेल्या सतीश शेळके यांनी जिल्हा परिषदेचे गणित डोळ्यासमोर ठेवत आमदारांना सोडत राजकीय आखाड्यात उडी मारली आहे.

विशेष म्हणजे त्यांनी ज्या आमदारांना सोडले आहे, त्या संदीप क्षीरसागर यांचे गाव आणि त्यांची राजकिय कारकिर्द सुरु झालेल्या नवगण राजूरी जिल्हा परिषद गटातूनच ते नशिब आजमवणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सतीश शेळके यांचा मुंबईत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक व स्वप्नील गलधर आदी उपस्थित होते.

MLA Sandip Kshirsagars PA Contest  In ZP Election News Beed
Sandip Kshirsagar : बीडमध्ये पंकजा मुंडेचा मोठा डाव; आमदार संदीप क्षीरसागर यांचा सख्खा भाऊच भाजपच्या वाटेवर!

सतीश शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे स्वीय्य सहाय्यक म्हणून काम करत होते. 2012 नंतर संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती होते, तेव्हापासून शेळके त्यांच्या सोबत आहेत. पुढे क्षीरसागर आमदार झाल्यानंतरही शेळके हेच क्षीरसागरांचे स्वीय्य सहाय्यक आहेत. अनेक वर्षांपासून स्वीय्य सहाय्यक म्हणून काम केल्याने त्यांना जिल्हा परिषदेसह इतर सर्वच शासकीय कार्यालयांच्या प्रशासनातील बारकावे, कामांच्या पद्धतीची जाण आहे.

MLA Sandip Kshirsagars PA Contest  In ZP Election News Beed
Beed News : बीड जिल्ह्यात भाजपला वातावरण पोषक, पण पंकजा मुंडे, सुरेश धस यांची अद्याप बैठकच नाही!

मात्र, त्यांचे गाव असलेले नवगण राजूरी जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढविण्यासाठी आता त्यांनी आमदारांना सोडत राजकीय पक्षात प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात यापूर्वी शरद पवारांचे स्वीय्य सहाय्यक असलेले दिलीप वळसे पाटील व फडणवीसांचे सहाय्यक राहीलेले अभिमन्यू पवार अशी काही मंडळी पुढे आमदार व इतर पदांवर पोचली. आता शेळके प्रशासनातून राजकारणाच्या वाटेवर चालताना कोणता पल्ला गाठतात? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

दरम्यान, बीड तालुक्याच्या राजकारणात नवगण राजूरी जिल्हा परिषद गट हा राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. याच गटातून संदीप क्षीरसागर, डॉ. दीपा क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर आदींची राजकारणात एंट्री झालेली आहे. याच गटात शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे आणि सतीश शेळके यांचेही गाव असल्याने सतीश शेळके यांनीही राजूरी गटातून तयारी चालविली आहे.

FAQs

1. संदीप क्षीरसागरांचे पीए कोण आहेत?
सतीश शेळके त्यांचे जवळचे सहकारी व सहाय्यक, जे अनेक वर्षांपासून त्यांच्या राजकीय कार्यात सहभागी आहेत.

2. ते कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत?
ज्या जिल्हा परिषद गटातून संदीप क्षीरसागरांनी राजकारणाची सुरुवात केली, त्याच नवगण राजूरी गटातून ते निवडणूक लढवणार आहेत.

3. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात काय परिणाम दिसतो आहे?
स्थानिक पातळीवर चर्चा रंगली असून काही ठिकाणी विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.

4. राष्ट्रवादी काँग्रेसची या निर्णयावर भूमिका काय आहे?
पक्षाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी क्षीरसागर गटात उलटसुलट चर्चा आहे.

5. या निवडणुकीत क्षीरसागर गटासाठी हे किती महत्त्वाचे आहे?
ही निवडणूक गटाच्या प्रतिष्ठेशी जोडलेली असल्याने क्षीरसागर समर्थकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com