MLA Suresh Dhas’s son Sagar Dhas's car involved in a deadly accident near Jategaon, resulting in the death of biker Nitin Shelke. Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas son car accident : मुलाच्या कार अपघातात तरूणाचा मृत्यू, पण 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा विषयच नाही; आमदार सुरेश धसांचं स्पष्टीकरण

Suresh Dhas son sagar dhas accident : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नितीन प्रकाश शेळके (34) असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे.

Jagdish Patil

Sagar Dhas car accident : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नितीन प्रकाश शेळके (34) असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे.

या अपघाताप्रकरणी सुरेश धसांचा मुलगा सागर याच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात अपघात झाला त्यावेळी सागर धस हाच वाहन चालवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या अपघाताची चर्चा राज्यभरात सुरू होती.

अशातच आता या अपघाताच्या घटनेवर आमदार सुरेश धस यांनी भाष्य केलं आहे. आमदार धस यांनी सांगितलं की, माझ्या मुलावर रीतसर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईला एका उपचारासाठी येत होता. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात अपघात झाला.

यामध्ये नितीन शेळके नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही. त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हचा अजिबात विषय नाही, असं त्यांनी सांगितलं. तर मुलावर गुन्हा दाखल झाला असून काल सायंकाळी साडेपाच वाजता त्याची सुटका झाल्याचंही धस यांनी सांगितलं आहे.

नेमका अपघात कसा झाला?

सोमवारी (ता.07) रात्री साडेदहाच्या सुमारास अहिल्यानगर-पुणे रोडवरील जातेगाव (ता. पारनेर) शिवारात आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर याच्या कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकी चालवत असलेल्या हॉटेल व्यावसायिक नितीन प्रकाश शेळके (वय. 34 रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

नगर-पुणे रस्ता ओलांडताना, भरधाव कारने शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे नीतीन शेळके कारखाली चिरडला गेला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर सुपा पोलिसांनी सागर धस याच्याकडील कार ताब्यात घेतलं आहे. कारच्या चालकाकडील भागाचे आणि दर्शनी भागाचे मोठं नुकसान झालं आहे. तसंच नंबर प्लेट देखील वाकलेली आहे यावरून धडक जोराची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT