Bajrang Sonawane Vilas Ghule Murder Case  Sarkarnama
मराठवाडा

Vilas Ghule Case: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना विलास घुले हत्येप्रकरणात मोठा धक्का; पोलिसांकडून 14 दिवसांनंतर निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

Vilas Ghule Murder Case: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील टाकळी येथे 20 जून रोजी भांडण सोडवायला गेलेल्या विलास घुले नावाच्या तरूणाचा एका टोळक्याने केलेल्या चाकू हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. ही हत्या कट रचून करण्यात आल्याचा आरोप घुले यांच्या कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात आला होता.

Deepak Kulkarni

Beed News: संतोष देशमुख प्रकरणानं राज्य हादरलं होतं. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीजगताची धक्कादायक आणि काळी बाजू समोर आली होती. यानंतर या जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढल्याच निदर्शनास आलं आहे. याचदरम्यान, आता केज तालुक्यात आणखी एका हत्याप्रकरणानं बीडचं राजकारण तापलं आहे. हॉटेल चालक विलास घुले हत्याप्रकरणानं पुन्हा एकदा हादरलं आहे. या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील केज येथील विलास घुले प्रकरणात रोज दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर गंभीर आरोप असल्यानं पुन्हा एकदा बीडचं राजकारण तापलं असून मुंडे विरुद्ध सोनवणे असा संघर्ष पेटला आहे.

याप्रकरणी आता मृत विलास घुले याचा भाऊ रमेश घुले याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे समर्थक असलेल्या बाळासाहेब पाथरकर यांच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी विलास घुले हत्या प्रकरणी रमेश घुलेंनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

यानंतर आरोपांनंतर विलास घुले हत्येप्रकरणात एसआयटीकडून चार तास सौरभ बजरंग सोनवणे यांची चौकशी करण्यात आली होती. पण पोलिसांना सौरभ सोनवणे यांच्याविरोधात कुठलाही पुरावा न आढळल्यानं जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विलास घुले यांचे भाऊ आणि तक्रारदार रमेश घुले यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब पाथरकर यांनी भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी रमेश घुलेंवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी केली होती.

यानंतर पाथरकर यांनी आपली बदनामी केल्याची तक्रार रमेश घुले यांनी दाखल केली. या तक्रारीनुसार, आता केज पोलीस ठाण्यात बाळासाहेब पाथरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरकर हे खासदार सोनवणे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील टाकळी येथे 20 जून रोजी भांडण सोडवायला गेलेल्या विलास घुले नावाच्या तरूणाचा एका टोळक्याने केलेल्या चाकू हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. ही हत्या कट रचून करण्यात आल्याचा आरोप घुले यांच्या कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात आला होता.

या हत्येप्रकरणी हल्लोखोरांवर कारवाई आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचा या हत्येमागे हात असल्याचे आरोपही केले गेले. आरोपी ज्यावेळी विलास घुले याला मारहाण करत होते, त्यावेळी ते सौरभ बजरंग सोनवणे यांचं नाव घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT