Chh. Sambhajinagar: औरंगाबाद जिल्हा बँकेच्या मतदानाला सुरुवात : शेतकरी विकास पॅनलमध्ये दिग्गजांची 'खिचडी'; पडद्यामागे काय घडलं?

Aurangabad DCC Bank Election, Ambadas Danve, Farmer Development Panel: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. अंबादास दानवे, अतुल सावे आणि विविध पक्षांचे नेते शेतकरी विकास पॅनलमधून एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
Aurangabad DCC Bank Election
Aurangabad DCC Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad DCC Bank Election: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या सत्तेत एकमेकांच्या विरोधात असलेले नेते सहकार बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे चित्र संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती प्रणित शेतकरी विकास पॅनलकडून उमेदवारी दाखल केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मात्र अंबादास दानवे यांनी जिल्हा सहकारी बँकेमध्ये राजकीय पक्ष किंवा चिन्ह नसते. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे त्यासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून आलं पाहिजे या हेतूने आपण महायुतीच्या पॅनलकडून नाही, तर शेतकरी विकास पॅनल कडून निवडणूक लढवत आहोत, असे स्पष्ट केले होते.

Aurangabad DCC Bank Election
Aurangabad District Bank Election : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट, महाविकास आघाडीत बिघाडी; अंबादास दानवे चक्क महायुतीच्या पॅनलमध्ये!

जिल्हा बँकेत पॅनल तयार करताना महायुती किंवा महाविकास आघाडी असा कुठेही उल्लेख नाही. हे सगळे माध्यमांनी उभे केलेले चित्र आहे. असे सांगत अंबादास दानवे यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. हीच भूमिका भाजपचे मंत्री अतुल सावे, काँग्रेसचे जालनाचे खासदार कल्याण काळे व इतर नेत्यांनीही घेतली आहे.

निवडणुकीपुरते आम्ही एकमेकांचे विरोधक असतो इतर वेळी आमचे सर्वांचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत असे अतुल सावे यांनी म्हटले आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्यावेळी शिवसेनेच्या ताब्यात होती. तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय खेळी आणि डावपेचांनी गेली कित्येक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक पहिल्यांदाच शिवसेनेच्या अधिपत्याखाली आली होती.

बँकेची सत्ता आणि सगळी सूत्र आपल्या हाती राहावी यासाठी अब्दुल सत्तार यांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. शेतकरी विकास पॅनलचे सात उमेदवार बिनविरोध आधीच निवडून आले आहेत. यामध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचाही समावेश आहे. शेतकरी विकास पॅनलची बँकेवर सत्ता आली तर आपल्या मुलाला अध्यक्ष करण्याचा अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न असणार आहे

Aurangabad DCC Bank Election
Abdul Sameer : जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट, अब्दुल समीर यांचा अर्ज वैध

जिल्हा बँकेसाठी आज १०५३ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. वीस संचालकांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत आठ संचालक आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. उर्वरित १२ संचालकांसाठी शेतकरी विकास पॅनल आणि भूमिपुत्र शेतकरी बचाव पॅनलमध्ये लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी आणि विरोधक नेते एकत्र एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com