Beed: बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा, आरोपींवर मोक्का लावा : विलास घुलेंचं कुटुंबीय आक्रमक, रणशिंगही फुंकलं!

Beed News, Vilas Ghule Case, Saurabh Sonawane: विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणे यांच्या अटकेसह सर्व आरोपींवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
Beed Vilas Ghule Murder Case
Beed Vilas Ghule Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News: विलास घुले हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचे नाव पिडित कुटुंब आणि ग्रामस्थांकडून घेतले जात आहे. पोलीसांनी पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे याचे नाव नोंदवून घेतले होते. एसआयटीने सौरभ सोनवणेची घरी जाऊन चार तास चौकशीही केली. परंतु अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. आरोपींना पळून जाण्यासाठी सौरभ याने मदत केल्याचा आणि तोच कटाचा सुत्रधार असल्याचा आरोप घुले कुटुंबियाकडून केला जात आहे.

Beed Vilas Ghule Murder Case
Beed Crime News : भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला; विलास घुले हत्येनंतर संतापाचा उद्रेक; पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंची विधिमंडळात मोठी मागणी

आता सौरभ सोनवणेला अटक करा आणि विलास घुले यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना मकोका लावा, या मागणीसाठी विलास घुले यांच्या पत्नीसह कुटुंबातील काही सदस्य गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. या प्रकाराने पोलीस प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून आंदोलन करणाऱ्या घुले कुटुंबातील सदस्यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावात तणावाचे वातावरण असून पोलीस सतर्क झाले आहेत.

२० जून रोजी केज तालुक्यातील टाकळी येथे विलास घुले या तरूण हाॅटेल चालकाचा एका टोळक्याने केलेल्या चाकू हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा हल्ला पुर्वनियोजित आणि कट रचून करण्यात आल्याचा आरोप घुले कुटुंबीय आणि टाकळीच्या ग्रामस्थांनी केला होता. केज पोलीस ठाण्यासमोर विलास घुले यांचा मृतदेह ठेवून रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. याची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन आंदोलकांशी मोबाईलवरून संवाद साधला होता. आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन आणि पोलीसांकडून सर्व आरोपींना अटक केल्यानंतर विलास घुले यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

Beed Vilas Ghule Murder Case
Beed: बीडमध्ये बजरंग सोनवणेंना मोठा धक्का; विलास घुले हत्याप्रकरणात मुलाचा पाय खोलात : पोलिसांकडून पहिली अॅक्शन

दरम्यान, आरोपींना पळून जाण्यासाठी आपली थार गाडी दिल्याचा आरोप असलेले खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांच्या अटकेसाठी घुले कुटुंबाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. विलास घुले यांच्या पत्नीचे व भाऊ रमेश घुले तसेच उमेश माने यांनी पाण्याचा टाकीवर चढून आंदोलन सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात प्रामुख्याने विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, सौरव बजरंग सोनवणे व उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीचा समावेश आहे.

या शिवाय रमेश घुले यांच्याबद्दल सोशल मीडियावर खोटी माहिती प्रसारित करून बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, कदम नामक महिलेने केलेल्या खोट्या आरोपांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच वरील मागण्या स्वतः एसपी साहेबांनी आंदोलन ठिकाणी येऊन मान्य कराव्यात तोपर्यंत रमेश घुले, उमेश माने व विलास घुले यांच्या पत्नी टाकीवरून खाली उतरणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com