Karuna Munde vs Dhananjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Karuna Munde complaint : 'मुलीला उचलून घेऊन जाण्याच्या धमक्या'; आमदार मुंडेंविरोधातील तक्रारींची मुख्यमंत्री दखल घेत नसल्याच्या करूणा मुंडेंच्या आरोपांनं खळबळ

Karuna Munde Mumbai Police Beed NCP MLA Dhananjay Munde threatening public : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील आमदार धनंजय मुंडे यांचे लोक धमकी देत असल्याची तक्रार पोलिसांकडे केल्याचे सांगत करूणा मुंडेंनी पुन्हा धक्कादायक आरोप केले आहेत.

Pradeep Pendhare

Karuna Munde vs Dhananjay Munde : मुंबई माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे-करूणा मुंडे पोटगी संदर्भात निकालानंतर, करूणा मुंडे यांनी पुन्हा खळबळजनक आरोप केले.

काही तरूणांना माझ्या मागे सोडलं आहे. मला धमक्या येत आहेत. मुलगी उचलून घेऊ जाऊ, अशी धमकी देत आहेत. मला तसे फोन देखील आले आहेत. याची रेकार्डिंग माझ्याकडे आहे. असा खळबळजनक दावा करताना, संदर्भात मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी देऊन देखील कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे, असेही करूणा मुंडे यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे बीडमधील माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या पोटगीच्या निकालाविरोधात मुंबईतील माझगाव सत्र न्यायालयात याचिका केली होती. सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळत पोटगीचा निकाल कायम ठेवला. यानुसार करूणा मुंडे यांना आता दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे. या निकालावर करूणा मुंडे यांनी न्यायालयाचे आभार मानले. परंतु पुन्हा धनंजय मुंडेंविरोधात आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

महिलेने विजय मिळवण्याचा ठरवल्यास तो मिळतोच, पण विजय सत्यासाठी असावा. मग समोर सीएम असो, पीएम असो की मंत्री असो, सत्य आपल्याबरोबर असेल,तर विजय मिळणारच, असे सांगताना करूणा मुंडेंविरुद्ध धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हा खटला संपूर्ण देशात इतिहास असेल. देशासह महाराष्ट्रातील मुली सुरक्षित नाही. महाराष्ट्रातील व्यवस्था खूप खालच्या पातळीवर ढासळली आहे. महिलांना न्याय मिळत नाही, असा आरोप करूणा मुंडे यांनी केला.

न्यायालयाकडे आमची मागणी 15 लाख रुपयांची होती, ती दोन लाख रुपयांची मान्य केली आहे. याविरोधात धनंजय मुंडेंनी याचिका दाखल केली होती. पण ती याचिका न्यायालयाने फेटाळली. मी धनंजय मुंडेंची बायको असल्याचे दुसऱ्यांदा सिद्ध झालं आहे. 1998 पासून मी त्यांची पहिली पत्नी आहे. 27 वर्षे मी त्यांच्या करिअरसाठी दिले आहेत. हक्क म्हणून मला न्याय हवा आहे, असेही करूणा मुंडे यांनी म्हटले.

इंदौर, परळी इथून लग्नाचे फोटो पुरावे म्हणून गोळा करता आले. माझ्या आय-पॅटमध्ये देखील फोटो आहेत. ते मी माध्यमांकडे देणार आहे. माझ्या मागे मुलं सोडण्यात आलं आहेत. करूणा मुंडेंना प्रेम जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न केल्यास 20 कोटी रुपये देणार आहे. हे षडयंत्र माझ्या मागे चालू आहे. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. वाल्मिक कराडने ज्या व्यक्तीला आॅफर दिली आहे, त्याचे रेकाॅर्डिंग माझ्याकडे आहे, असा दावा देखील करूणा मुंडे यांनी केला.

सांताक्रूझ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मला असे मेसेज देत आहे की, तुझ्या मुलीला उचलून घेऊ जाणार आहे. धनंजय मुंडेंविरोधात गेल्यास, न्यायालयात गेल्यास मुलीला उचलून घेऊ जाणार असल्याच्या धमक्या दिल्या आहेत. एका बापाची औलाद असेल, तर उचलून घेऊन जाऊन दाखवच, असे आव्हान देताना, यामागे धनंजय मुंडे यांचे लोकं आहेत, असा खळबळजनक आरोप करूणा मुंडे यांनी केला.

मुलीचे नाव टाकून धमक्या दिल्या जात आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे याबाबत तक्रार करणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कंटाळली आहे. तरी कारवाई होत नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी तक्रारी करत आहेत. तरी सीएम यांनी दखल घेतलेली नाही. पुरावे देण्यासाठी वेळ मागितली होती. पण ती देखील देत नाहीत, असा दावा देखील करूणा मुंडे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT