Dhananjay Munde court order : धनंजय मुंडेंना न्यायालयाचा दणका; करुणा मुंडेंना दोन लाख रुपयांची पोटगी द्यावीच लागणार

Mumbai Sessions Court Beed NCP MLA Dhananjay Munde 2 lakh monthly maintenance Karuna Munde : बीड एनसीपी आमदार धनंजय मुंडे यांना करूण मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा माझगाव सत्र न्यायालयाचा आदेश.
Dhananjay Munde Karuna Munde 1
Dhananjay Munde Karuna Munde 1Sarkarnama
Published on
Updated on

Karuna Munde maintenance case : मुंबईच्या माझगाव सत्र न्यायालयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडमधील माजी मंत्री आमदार धनंजय मुंडेंना दणका दिला आहे. करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.

वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटगी देण्याचा आधीचा निकाल होता. त्या विरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर माझगाव सत्र न्यायालयाने निर्णय कामय ठेवत आमदार मुंडे यांना दणका दिला आहे.

नुकतेच मंत्रीपद गमावल्यानंतर आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आणखी धक्का बसला आहे. करुणा शर्मा-मुंडे यांच्या पोटगी प्रकरणात मुंबई माझगाव न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळत करुणा मुंडे यांची दोन लाख रुपये पोटगी मिळण्याची मागणी रास्त ठरवली आहे.

Dhananjay Munde Karuna Munde 1
Karuna Shrama : करुणा शर्मांचा नवा बॉम्ब; धनंजय मुंडेंचं 'अंतिम मृत्यूपत्र' कोर्टात सादर

धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र हे पुरावे न्यायालयाने (Court) ग्राह्य धरले. त्याआधारे करुणा मुंडे यांच्या पहिली पत्नी असण्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना दोन लाख रुपयांची दर महिना पोटगी देण्यात यावी, असा निकाल दिला होता. परंतु धनंजय मुंडे यांनी त्या विरोधात माझगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Dhananjay Munde Karuna Munde 1
MNS Marathi language banks : मनसे सैनिकांना बँकांमधील आंदोलनावर पुन्हा 'राज' आदेश; मंत्री सामंतांच्या भेटीची 'जादू चल गयी'?

यावर तीन ते चार सुनावण्या झाल्या त्यात करुणा मुंडे यांनी स्वतः युक्तिवाद केला. त्यांनी कागदोपत्री पुरावे सादर करून 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीने लग्न केल्याचे सांगितले. तसेच आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन दुसरे लग्न केले. परंतु करुणा मुंडे यांच्यासोबत घटस्फोट घेणार नाही. तसेच करुणा मुंडे आणि दोन्ही मुलांसोबत राहणार असल्याचा धनंजय मुंडे यांच्या स्वीकृती पत्रात उल्लेख असल्याचे स्पष्ट केले. मात्र हे स्वीकृतीपत्र खोटे असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला होता.

न्यायालयाने पुरावे ग्राह्य धरत करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल देत कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यानंतर करुणा मुंडे पोटगी वाढवण्याची मागणी देखील करू शकतात. तर धनंजय मुंडे या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com