Beed leader Dhananjay Munde addressing students at a school event in Parli, using a movie reference to comment on contemporary political dynamics and public perception. Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : विद्यार्थ्यांना विचारलं, 'धुरंधर' पिक्चरचा 'हिरो' कोण? तर मुलांनी 'व्हिलन'चेच नाव घेतले! धनुभाऊ म्हणतात, 'हे असं आहे...'

Dhananjay Munde speech : परळीतील शाळा कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी ‘धुरंधर’ चित्रपटाचा संदर्भ देत राजकारणावर टोला लगावला. हिरोपेक्षा व्हिलन लक्षात राहतो, असे म्हणत विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

Jagdish Pansare

Beed News : धनंजय मुंडे सध्या आपल्या भाषणातून चांगलेच शालजोडे लगावताना दिसत आहेत. आज परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथील एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना अशात तुम्ही पाहिलेल्या सिनेमाचे नाव आठवते का? असा प्रश्न करत नावही विचारले. त्यावर एका मुलाने 'धुरंधर'असे सांगितले.

यावर त्यात हिरो कोण आहे? या प्रश्नावर विद्यार्थाने चक्क अक्षय खन्नाचे नाव घेतले. उत्तर ऐकून धनंजय मुंडे म्हणाले, ही अशी परिस्थिती आहे. हिरोपेक्षा लोकांना आता व्हिलनच लक्षात राहतो. रहेमान डकैत माहित आहे, पण हिरो कोणालाच माहित नाही, असे म्हणत आमच्या राजकारणातही असंच आहे, असा चिमटा काढला. धनंजय मुंडे यांचा इशारा नेमका कोणाकडे होता? यावर आता चर्चा सुरू आहे.

राजकारणात कायम संघर्ष करावा लागतो, मी ही करतोय. पण तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि पाठिंबा असल्यामुळे मी सगळ्या परिस्थितीला तोंड देत आहे. आता थोडा शांत आहे, पण योग्यवेळी सगळ्यांना उत्तर देण्यास मी सक्षम आहे. तुमचे प्रेम असेच माझ्यावर कायम राहू द्या, बाकी विरोधकांना मी पुरून उरेल, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला.

धर्मापुरी येथील शिक्षण महर्षी दिवंदत गौतम बापू नागरगोजे व शिवशलामाई नागरगोजे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने जिजामाता विद्यालयात धनंजय मुंडे यांनी आवर्जून हजेरी लावली. नागरगोजे परिवाराशी असलेले कौटुंबिक संबंध सांगतानाच त्यांनी इथे शिकलेले विद्यार्थी एमपीएससी , युपीएससीत यश मिळवून आयएएस, आयपीएस अधिकारी झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोबाईल सारखे उपयुक्त गॅझेट दुसरे नाही, पण त्याचा योग्य वापर केला तर. पण वाईट सवय लागयाची झाली तर यांच्यासारख दळभद्री दुसरं काही नाही, असा सल्लाही धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.गौतम बापू नागरगोजे यांना राजकारणात पदे मिळवण्याची संधी असताना सुद्धा त्यांनी पदांच्या ऐवजी शैक्षणिक संस्था उभारून ग्रामीण भागात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या आणि मुंडे कुटुंबाचे दोन पिढ्यांचे ऋणानुबंध आजही कायम असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT