

नववर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांनी बीडमध्ये 1363 विकासकामांचं भूमिपूजन केलं.
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करत बीडकरांचे आभार मानले.
Beed NCP News : अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर येथील जनतेला बारामती, पिंपरी-चिंचवडमधील विकास पॅटर्न राबवण्याचे आश्वासन दिले. अनेक योजना, विमानतळ, तरुणांना प्रशिक्षित करणाऱ्या संस्था देत अजित पवारांनी 'मी सांगितलं की करून दाखवतो' हा शब्द प्रत्यक्षात उतरवण्याकडे वाटचाल सुरू केली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत अजित पवारांनी सातत्याने सत्ता द्या, बारामती सारखा विकास करून दाखवतो, पस्तीस वर्षात झाले नाही, ते पाच वर्षात करून दाखवतो, असा विश्वास बीडकरांना दिला होता.
अजित पवारांच्या या शब्दावर विश्वास ठेवत बीड नगरपालिकेची सत्ता लोकांनी त्यांच्या हाती दिली. त्यानंतर आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमध्ये येत विविध विकासकामांचा नारळ अजित पवारांनी फोडला. बीडकरांनी भरभरून यश दिल्यामुळे ते फिदा झाल्याचे चित्र पहायला मिळाले. नववर्षाच्या प्रथम शुभदिनी बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा सोहळा आज शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर पार पडला. जिल्हा परिषद अंतर्गत 1363 विकास कामांचं भूमिपूजन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले.
बीड जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा शुभारंभ होत असल्याचा उल्लेख अजित पवारांनी आपल्या भाषणात केला. ग्रामीण भागापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.
पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, शाळांचं सुसज्जीकरण, समाजोपयोगी लघु विकासकामं यांवर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 1200 हून अधिक शाळांची कामं सुरूअसून शिक्षण आणि समाज यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्यानं मदत दिली जात असल्याचे ते म्हणाले.
बीडमध्ये इलेक्ट्रिक रेल्वे, विमानतळ प्रकल्प तसंच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवण्यात येत आहेत. विकास कामांचा दर्जा राखला गेला पाहिजे, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हीच आमची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दूरदृष्टीनं स्वराज्य उभारलं, त्याच प्रेरणेतून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा शब्द या निमित्ताने अजित पवारांनी दिला.
बीड शहरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या सहकार संकुल इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. ही इमारत बीडच्या विकासात मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी अशी विकासकामं सातत्यानं सुरू राहतील, असे आश्वासन पवारांनी बीडकरांशी संवाद साधताना दिले.
Q1. अजित पवार बीडमध्ये कधी आले?
➡️ नववर्षाच्या पहिल्या दिवशी, 1 जानेवारी रोजी.
Q2. किती विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं?
➡️ एकूण 1363 विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं.
Q3. हे विकासकामे कोणत्या अंतर्गत आहेत?
➡️ जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास प्रकल्प आहेत.
Q4. या कार्यक्रमात आणखी काय करण्यात आलं?
➡️ आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Q5. अजित पवारांनी बीडकरांबाबत काय भावना व्यक्त केल्या?
➡️ बीडकरांनी दिलेल्या विश्वासामुळे आपण भारावून गेल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.