Dhananjay Munde emotional Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde emotional : 250 दिवस 'मीडिया ट्रायल' झाली, दोनदा मरता-मरता वाचलो; धनंजय मुंडे भावूक, आजारपणावरही भाष्य (Video)

Dhananjay Munde Gets Emotional While Speaking on Media Trial : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी 'मीडिया ट्रायल'वर भाष्य केले आहे.

Pradeep Pendhare

Beed political news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बीडमधील आमदार धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नामोल्लेख टाळून झालेल्या 'मीडिया ट्रायल'वर भाष्य केलं.

"सलग 250 दिवस माध्यमांवर माझी ट्रायल चालली. त्या दिवसांत मी दोनदा मरता-मरता वाचलो. पण मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे," असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हस्ते परळी (जि. बीड) इथल्या बोधेगावमधील विकास कामांचं लोकार्पण झालं. यावेळी त्यांनी गत काळावर भाष्य करताना, धनंजय मुंडे चांगलेच भावूक झाले होते. पण आपला जन्मच जनतेच्या सेवेसाठी झाला आहे. चुकीचे केले नसल्याने, या कठीण काळात डगमगलो नाही, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.

धनंजय मुंडे यांनी बीड (BEED) गेवराईमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नामोल्लेख टाळत म्हणाले, "ज्या घटनेशी माझा काहीच संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग 250 दिवस माध्यमांवर माझी ट्रायल चालली. त्या दिवसांत मी दोनदा मरता-मरता वाचलो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे."

आजारपणावर भाष्य

धनंजय मुंडे यांनी, "तो कठीण काळ होता. पण मी कुठल्याही माध्यमांवर बोललो नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो. मी सगळ्या आजारांतून बाहेर पडलो आहे. फक्त आता डोळ्याचं थोडे बाकी आहे. पण मी जन्माला आलो तोच, लोकांची सेवा करायला, म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरे काही नाही," असे म्हटले.

विजयाचा आनंद साजरा केला नाही

विधानसभा निवडणुकीतील विजयाचा उल्लेख आमदार मुंडे यांनी केला. "या निवडणुकीत मायबाप जनतेने मला 1 लाख 42 हजार मतांच्या प्रचंड आघाडीने निवडून दिले. मते घ्यायला महाराष्ट्रात आपण एक नंबरला आहोत. मात्र, एवढा मोठा विजय मिळूनही आपल्याला तो साजरा करता आला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.

घडवून आणलेलं संकट, मुंडेंचं सूचक विधान

तसेच, महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले. त्याचीही आनंद घेता आला नाही. जी संकटं आली, ती अचानक आलेली संकटं होती आणि घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणे कठीण असते, असे सूचक विधान धनंजय मुंडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, बाळासाहेब दौडताले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT