Beed firing case News : बीड जिल्ह्यातील वातावरण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तापले आहे. यातच विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. त्यातच मुंडेंच्या कार्यकर्त्यांने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी लगेचच याप्रकरणी कारवाई करीत वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयला अटक केली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे विरोधकांच्या बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन केल्या जात असलेल्या आरोपाला आणखी बळ मिळाले होते. या व्हिडिओच्या आधारे आता पोलिसांनी मोठी अॅक्शन घेतली असून या याप्रकरणी लगेचच कारवाई करीत वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असलेल्या कैलास फडला अटक केली.
परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांनतर बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये येतच या प्रकरणी कारवाई केली. लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरित आरोपीला अटक करणार असल्याचे त्यांनी म्हटले असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. त्यामुळे आता येत्या काळात कोणावर कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी जे कोणी गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संबंधित आरोपी कोणच्याही, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडायचे नाही, त्यालाही फाशी झालीच पाहिजे, या मताचा मी पहिल्या दिवसांपासून आहे, अशा शब्दांत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संतोष देशमुख खून प्रकरणावर भाष्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.