Santosh Deshmukh Murder: वाल्मीक कराडच्या `त्या` बॅनरने नाशिकमध्ये कार्यकर्ते झाले आक्रमक!

Maratha politics; justice for Santosh Deshmukh, Maratha activist aggressive in Nashik-सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी मोकाट कसे? सरकारवर वाढवणार दबाव, बीडच्या मोर्चासाठी सुरू आहे जोरदार मोर्चे बांधणी.
Sarpanch Santosh deshmukh.
Sarpanch Santosh deshmukh.Sarkarnama
Published on
Updated on

Maratha News: मस्साजोग (बीड) ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्य शासनाची डोकेदुखी करण्याची चिन्हे आहेत. बीड येथे होणाऱ्या मोर्चासाठी नाशिकमध्येही कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या संदर्भात महायुती सरकारवर गंभीर आरोप होत आहेत.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. विशेषतः बीड येथे शनिवारी होणाऱ्या मोर्चाची तयारी नाशिक मध्येही सकल मराठा समाजाकडून जोरकसपणे सुरू आहे.

Sarpanch Santosh deshmukh.
Radhakrishna Vikhe : विखे-थोरातांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार; महायुतीकडून संगमनेरमध्ये 'स्थानिक'साठी मोर्चेबांधणी

शिंगवे (निफाड) येथे लावलेल्या एका बॅनरवर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा बॅनर लावण्यात आलाय त्यावर बीडच्या वाल्मीक कराड यांचा फोटो त्यांच्या काही समर्थकांनी लावला होता. या फलकामुळे गावातील वातावरण तापले. या फलकाला उत्तर म्हणून सोशल मीडियावर तसेच आक्रमक उत्तर देखील देण्यात आले. आता या निमित्ताने कार्यकर्ते बीडच्या मोर्चाला जाण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे.

Sarpanch Santosh deshmukh.
Mahayuti Politics: छगन भुजबळ आऊट, माणिकराव कोकाटे इन आणि महाविकास आघाडी...

या संदर्भात सकल मराठा समाजाचे संयोजक नाना बच्छाव यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची संवाद साधला आहे. या संदर्भात सर्व कार्यकर्ते उद्या सायंकाळी नाशिकमध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते बीडला रवाना होतील.

यामध्ये सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष देशमुख यांची हत्या हा प्रतिष्ठेचा विषय केला आहे. विशेषतः आता विविध तालुक्यांमध्ये गावागावात संतोष देशमुख यांना न्याय कधी देणार?. सरकार यावर संशयास्पद भूमिका का घेत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला अशी मागणी केली जात आहे. सकल मराठा समाजातर्फे बीडच्या मोर्चाची नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

याबाबत तरुण कार्यकर्त्यांमध्येही मोर्चा बीडमध्ये मात्र तयारी आणि राज्य शासनावर दबाव वाढविण्यासाठी सक्रिय कार्यकर्ते नाशिक मध्ये अशी स्थिती आहे. यानिमित्ताने महायुतीच्या सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

यानिमित्ताने राजकारण देखील तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी आणि वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाकडून राज्य शासनावर टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर बीड येथील मोर्चा चर्चेचा विषय आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com