Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या हत्येविरोधातील एल्गारात शरद पवारांनंतर हा नेता होणार सहभागी

Chhatrapati Sambhajiraje News :स्साजोग गावातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी २८ डिसेंबरला बीड येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.
Santosh Deshmukh 3
Santosh Deshmukh 3Sarkarnama
Published on
Updated on

Pune News :  मस्साजोग गावातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ  शनिवारी २८ डिसेंबरला बीड येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा असणार असून या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. शरद पवार सोबत जितेंद्र आव्हाड देखील या मोर्चात सहभागी होतील असं सांगण्यात येत आहे. 

यासोबतच आता छत्रपती संभाजीराजे यांनी आपण संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये निघणाऱ्या  मोर्चात  सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून वाल्मिक कराड सह धनंजय मुंडेंचे यांच्यावर टीका केली आहे. 

या पोस्ट मध्ये छत्रपती संभाजीराजे म्हणाले, संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये निघणाऱ्या मोर्चात मी सहभागी होणार आहे, या मोर्चात तुम्ही देखील सहभागी व्हावे.

Santosh Deshmukh 3
Santosh Deshmukh Murder: वाल्मीक कराडच्या `त्या` बॅनरने नाशिकमध्ये कार्यकर्ते झाले आक्रमक!

दि. २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये आयोजित मोर्चामध्ये मी सहभागी होत आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, आरोपी वाल्मिक कराड व इतर दोषींना तात्काळ अटक करावी, ही माझी ठाम मागणी आहे. मी पहिल्याच दिवशी भूमिका घेतली होती की, धनंजय मुंडे यांचे आरोपींशी जवळचे संबंध असल्यामुळे प्रशासनावर दबाव येऊ शकतो. नंतर मुंडे यांनी स्वतःच आरोपी वाल्मिक कराडसोबतचे संबंध मान्य केले आणि त्यांची बाजू उघडपणे घेतल्याने हा दबाव स्पष्ट झाला.

Santosh Deshmukh 3
Sonu Sood : "सोनू सूद म्हणतो , 'मला इंटरेस्ट नव्हता म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली'"  

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचे कर्तव्य सरकारचे आहे, परंतु जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे दुर्दैवी आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी देशमुख कुटुंबीयांसोबत ठामपणे उभा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com