Beed Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजलगाव मतदारसंघातून पक्षात नसलेल्या व भाजपचे माजलगाव विधानसभा प्रमुख मोहन जगताप यांना उमेदवारी दिल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला व मोहन जगताप यांना पक्षात प्रवेश न घेताच ऐनवेळी उमेदवारी दिली हे दुर्देव असल्याची टीका माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांनी केली.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. दिवसेंदिवस माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नव - नविन व्टिस्ट पाहण्यास मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, नारायण डक, ज्योती डक, मनोहर डाके ईश्वर मुंडे यांनी मुलाखती दिल्या होत्या. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सोनवणेंच्या विजयासाठी मोठा हातभार लावला होता असे असताना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विश्वासघात करत भाजपाचे विधानसभा प्रमुख असणारे जगताप यांना उमेदवारी देऊन निष्ठावंत असणार्यांचा व पक्षामध्ये प्रवेश घेणार्याचाही विश्वासघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP) केला आहे, असे राधाकृष्ण होके पाटील म्हणाले.
माजलगाव विधानसभा मतदारसंघ (Majalgaon Vidhansabha Constituency) सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी राहिला होता. परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालीतून निष्ठावंतांना डावलण्याच्या नाट्यमय घडामोडींच्या चर्चा असल्याचे होके पाटील यांनी सांगीतले.
रमेश आडसकरांचा मागील विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. असे असले तरी आडसकर यांनी खचून न जाता मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघातील माजलगाव, वडवणी, धारूर या तिनही तालुक्यातील जनतेशी संपर्क ठेवलेला आहे.
आडसकरांना उमेदवारी द्यायचीच नव्हती तर शरद पवारांनी पक्षप्रवेशाचा घाट कशासाठी घातला असा प्रश्न मतदारसंघवासीयांसमोर आहे, असेही होके पाटील म्हणाले. या विधानसभा निवडणुकीमध्ये आडसकरांच्या मागील पाच वर्षात जनतेशी असणाऱ्या संपर्काची पावती निश्चितच मतदार विजयामध्ये रूपांतरीत करतील असा विश्वास होके पाटील यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.