Sharad Pawar NCP Candidate List : शरद पवारांच्या पक्षाची पाचवी यादी जाहीर; पंढरपूर, माढ्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब

Maharashtra Assembly Election Abhijeet Patil Anil Sawant : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत 87 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंगळवारी पाचवी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये माढा, पंढरपूर, मुलुंड, मोहोळ आणि मोर्शी मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने आतापर्यंत 87 मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत.

माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पंढरपूरातून अनिल सावंत यांना तिकीट देण्यात आले आहे. मोहोळ मतदारसंघात राजू खरे यांना लॉटरी लागली आहे. या मतदारसंघातून आधी सिध्दी रमेश खरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. आता त्यांच्याऐवजी खरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील.

Sharad Pawar NCP
Dharashiv : धाराशिवमध्ये आघाडीत बिघाडी, खासदार ओम राजेनिंबाळकरांना धक्का; चुलत भाऊ बंडखोरीच्या तयारीत

पंढरपुरात आघाडीत बिघाडी

पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने याआधाची भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर आता शरद पवारांच्या पक्षानेही अनिल सावंत यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात आघाडीतील दोन पक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोण उमेदवार माघार घेणार की मैत्रीपूर्ण लढत होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे

Sharad Pawar NCP
Trupti Sawant : राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत मनसेत; राज ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर

पाचव्या यादीतील उमेदवार -

माढा – अभिजीत पाटील

मुलुंड – संगित वाजे

मोर्शी – गिरीश कराळे

पंढरपूर – अनिल सावंत

मोहोळ – राजू खरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com