dhanjay munde, prakash salunke Sarkarnama
मराठवाडा

Prakash Solanke : धनंजय मुंडे माझा नेता नाही; प्रकाश सोळंकेंच्या विधानाने राष्ट्रवादीत फटाके फुटू लागले!

NCP internal rivalry News : धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले असले तरी त्यांचे नेतृत्व आपण मानत नाहीत, असा आक्रमक पावित्रा प्रकाश सोळंके यांनी घेतला आहे.

Jagdish Pansare

NCP Politics : एकाच पक्षात असले तरी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि परळीचे धनंजय मुंडे यांच्यात फारसे सख्य नाही. धनंजय मुंडे यांनी सोळंके यांच्यावर थेट टीका करणे टाळले, परंतु प्रकाश सोळंके मात्र संधी मिळेल तेव्हा मुंडे बहिण-भावाचा समाचार घेत असतात. बीड जिल्ह्यात 1980 पासून कॅबिनेट मंत्रीपद फक्त एकाच वर्गासाठी राखील ठेवल्यासारखे चालले आहे, असे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. आता धनंजय मुंडे माझा नेता नाही, असे सांगत त्यांनी पुन्हा त्यांना डिवचले आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांतर्गत सुरू असलेले शीतयुद्ध आणि कुरघोडी वेळोवेळी चव्हाट्यावर येत असते. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एका मुलाखतीत धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले असले तरी त्यांचे नेतृत्व आपण मानत नाहीत, असा आक्रमक पावित्रा घेतला आहे. धनंजय मुंडे माझा नेता नाही, असे स्पष्ट करतानाच आपल्यामधील दुरावा कायम असल्याचे दाखवून दिले.

जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर आणि मंत्रिपदाच्या संधीबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना प्रकाश सोळंके यांनी 1980 पासून बीड जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपद फक्त एकाच वर्गासाठी राखीव ठेवल्यासारखे चालले आहे, असा आरोप केला. धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यासोबतच्या संबंधांवर मी त्यांच्या हाताखाली काम करावे असे नाही, मी त्यांच्या काकांसोबत काम केले आहे, ते माझे नेते होते, हे माझे नेते नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले.

बीडच्या राजकारणात ओबीसी आणि मराठा नेतृत्वाचा वाद सुरू असतानाच प्रकाश सोळंके यांच्या या विधानाने तो अधिक तापणार असे दिसते. जिल्ह्यात मोठे व्हायचे असेल आणि नेतृत्व करायचे असेल, तर किमान दहा आमदार निवडून आणण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे, तरच पक्ष आणि वरिष्ठ तुमची दखल घेतात. मागील निवडणुकीतील निकालांचा संदर्भ देत त्यांनी, निवडणुकीत रडत-पडत निसटता विजय मिळवून कोणीही बढाया मारू नये, आधी स्वतःची ताकद सिद्ध करावी लागते, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांना नाव न घेता टोला लगावला.

धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या सोळंके यांनी मंत्री पकंजा मुंडे यांच्या मंत्रीपदाबाबत मात्र वेगळी भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पक्षाने त्यांना विधानपरिषद आणि त्यानंतर थेट कॅबिनेट मंत्रिपद दिले. पंकजाताई या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत म्हणून नव्हे, तर मुंडे साहेबांपासून चालत आलेली ओबीसीची भक्कम व्होट बँक आजही त्यांच्या पाठीशी उभी आहे म्हणून. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हा मतदारवर्ग त्यांना मानतो, असेही सोळंके म्हणाले.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. पार्थ पवार यांनी मुंबईत काही आमदारांची बैठक घेतली, इतर आमदारांशी संपर्क साधला असेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीडमध्ये नेमकी काय अवस्था आहे? हे प्रकाश सोळंके यांच्या विधानावरून स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT