Beed Jail CCTV Cameras Off : बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या कटाचा प्रमुख वाल्मिक कराड असल्याचे 'SIT'ने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. परंतु कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्याबरोबर असलेल्या सहआरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबियांना संशय आहे.
यासंदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवण्याची तयारी केल्याचे जाहीर करताच, वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील 'CCTV' बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बीड (BEED) जिल्हा कारागृहाचे अधीक्षक यांनी 'CCTV' दुरुस्तीसाठी लिहिलेले पत्र समोर आले आहे. कारागृहातील 'CCTV' कॅमेऱ्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी, असे हे पत्र आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबियांने वाल्मिक कराड याला कारागृहात मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटविषयीच्या संशयाला अधिकच बळ मिळाले आहे.
बीड कारागृहाचे अधीक्षक यांनी पत्रात CCTV कॅमेरे खरेदीची प्रक्रिया केंद्र सरकारच्या ई-मार्केट प्लेस या संस्थेने 8 जानेवारी 2024 नुसार पूर्ण केली आहे. कारागृहातील महत्त्वाच्या ठिकाणचे CCTV कॅमेरे बंद आहेत. कॅमेऱ्यांसाठी बसवलेल्या बॅटरी बॅकअप वारंवार बंद होत आहेत. परिणामी कारागृहातील संपूर्ण CCTV सिस्टम बंद पडत राहते. कारागृहातील काही ठिकाणचे CCTV कॅमेरे बंदच आहेत.
याशिवाय कॅमेऱ्यांची केबल देखील जळाली आहे. नवीन केबल बसवण्याची आवश्यकता आहे. कारागृहात विविध गंभीर गुन्ह्यातील बंदी असून, बंद पडलेले CCTV कॅमेरे तात्काळ सुरू करावेत. बंद कॅमेऱ्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारागृहातील सर्व CCTV कॅमेरे 24 तास कसे सुरू राहतील, याची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी हत्येच्या कटातील वाल्मिक कराड आणि त्याच्याबरोबर कारागृहात असलेल्या आरोपींना 'व्हीआयपी ट्रीटमेंट' मिळत असल्याचा आरोप केला आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्यासाठी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यातच कारागृह अधीक्षकांचे हे पत्र समोर आल्याने वाल्मिक कराडला कारागृहात मिळत असलेल्या 'ट्रीटमेंट'विषयी अधिकच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
देशमुख कुटुंबियांची याची तक्रार भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे देखील केली आहे. भाजप आमदार धस यांनी तक्रारीचे 13 मुद्दे असल्याचे म्हटले आहे. वेळेनिहाय या तक्रारी असून, आरोपींना मटण देखील पुरवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचे व्हिडिओ पुरावे नाहीत, असे स्पष्ट करताना, 'व्हीआयपी ट्रीटमेंट'मध्ये कारागृहातील काही पोलिस असल्याचे माहिती समोर येत आहे. त्याची चौकशी करून निलंबनाची मागणी करणार असल्याचे भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यावेळी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.