Rupali Chakankar 1 Sarkarnama
मराठवाडा

Beed sexual harassment case : बीडमधील लैंगिक छळप्रकरणात रूपाली चाकणकरांचा 'मोठा' दावा; पवार अन् खाटोकरवर आणखी एक गुन्हा दाखल

Beed Sexual Harassment Case Rupali Chakankar Suspects Political Angle New FIR Against Vijay Pawar and Prashant Khatokar : बीडमधील कोचिंग क्लोससमधील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी रूपाली चाकणकर यांनी मोठा दावा वर्तवला आहे.

Pradeep Pendhare

Beed latest political news : बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळात महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात बारकाईनं तपास केला जात आहे. मोबाइलमधील रेकॉर्डिंग, सीडीआर तपासले जाणार आहेत. पुरवणी आरोपपत्रात नवीन मुद्दे जोडले जातील.

यात राजकीय संदर्भही तपासात उघड होऊ शकतो, असा दावा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, आणखी एका पालकानं पुढं येत, मुलीचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार दिल्याने खळबळ उडली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, "पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग पूर्ण ताकदीने पाठीशी उभा आहे. पोलिसांना विनादबाव कारवाईचा आदेश आहे. तपासणादरम्यान, उच्चकोटीची गोपनीयता राखण्याच्या सूचना आहे". राजकीय संदर्भही तपासात उघड होऊ शकतो. त्यामुळे यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे रूपाली चाकरणकर यांनी सांगितले.

'तपासादरम्यान मोबाइलमधील रेकॉर्डिंग, सीडीआर तपासला जाणार आहे. पुरवणी आरोपपत्रात नवीन मुद्दे जोडले जातील. संबंधित पालक व विद्यार्थिनीची पोलिस (Police) भेट निश्चित केली जाईल. पीडितेला न्याय मिळवून देणार', असा निर्धार रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

2023मध्येही तक्रार

पीडिता प्रचंड मानसिक तणावात असून, नैराश्‍येतून आयुष्य संपवण्याच्या विचारापर्यंत ती आली होती, असा गंभीर दावा चाकणकर यांनी केला. 2023मध्येही अशी तक्रार दाखल झाली होती. पण त्याची दखल का घेतली गेली नाही, याबाबत संबंधिताचा जबाब घेण्याच्या सूचना रूपाली चाकणकर यांनी दिल्या. इतर विद्यार्थिनींनाही अशा प्रकारच्या कृत्यांचा सामना करावा लागला असेल, तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन केल्या.

आणखी एक गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांवर गुन्हा दाखल असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. यातच आणखी एका पालकाने पुढे येत, लैंगिक छळाची तक्रार दिली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा नोंदवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT