Sanjay Gaikwad controversy : 'नकली शिवसेना, नकली वाघ, नकली दात'; ठाकरेंच्या वाघिणीनं गायकवाडांचा बुरखाच फाडला

Jayshree Shelke Slams Shiv Sena MLA Sanjay Gaikwad in Buldhana : छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बोलताना आमदार संजय गायकवाड यांची घसरलेल्या जीभेवरून टीका सुरू आहे.
Sanjay Gaikwad controversy
Sanjay Gaikwad controversySarkarnama
Published on
Updated on

Buldhana Shiv Sena politics : मुंबईत ठाकरे बंधूंचा आवाज मराठी विजयी मेळाव्यावर टीका करताना सत्ताधारी महायुतीमधील भाजप अन् शिवसेना नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. बुलढाणा इथले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर टीका करताना जीभ घसरली.

छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी, येसूबाई, जिजाऊ यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले. याशिवाय ठाकरे नावाचा ब्रँड राहिला नसल्याचे म्हणताना, बाळासाहेब ठाकरे असतानाच 288 आमदार निवडून आले असते, असे म्हटले. संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानाला, शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी जशास तसे उत्तरं दिलं आहे.

जयश्री शेळके यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. म्हणाल्या, "दिल्लीची (Delhi) हुजरेगिरी करण्यात किती लाचारीं करायची? याची मर्यादा ओलांडण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांच्या कृतीतून दिसते. काल या आमदाराने शिवराय, संभाजीराजे, जिजाऊ, ताराराणी यांच्याबद्दल जे अपमानस्पद वक्तव्य केले, त्याबद्दल त्यांनी राज्याची माफी मागितली पाहिजे".

ज्यांची नकली शिवसेना (Shivsena), ज्यांच्या गळ्यात नकली वाघाचा, नकली दात घालून फिरणाऱ्या, अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्र आणि मराठी प्रेमाची अपेक्षाच करू शकत नाही, असा देखील टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी लगावला.

Sanjay Gaikwad controversy
BJP Ganesh Hake : भाजप नेत्याकडून शेतकऱ्याची थट्टा; मदतीऐवजी औत ओढतानांचं फोटोशूट, खुलासा करता करता दमछाक

'ठाकरे 'ब्रँड'बद्दल बोलताना हा आमदार गायकवाड यांना स्वतःचा इतिहासचा विसरला पडल्याची आठवण जयश्री पवार यांनी करून दिली. बुलढाण्यात विधानसभा निवडणुकीत हा तीन वेळा पराभूत झाला. चौथ्यादा ठाकरे ब्रँडमध्ये आला आणि निवडून आला. याला ठाकरे ब्रँड म्हणतात', याची आठवण जयश्री शेळके यांनी करून दिली. ज्यांना वाटतं की ठाकरे हा ब्रँड नाही, त्यांनी बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरणे सोडून द्यावे, असा देखील सल्ला शेळके यांनी दिला.

Sanjay Gaikwad controversy
Beed Parli politics : धनंजय मुंडेच्या परळीत जादूटोण्याचा प्रयोग? अजितदादाच्या पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याचा प्रताप

आमदार गायकवाड काय म्हणाले होते

आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. परराज्यात गेल्यावर हिंदी भाषा तुम्ही बोलणार नाहीत का? तुम्हाला जगात टिकायचं असेल तर, सगळ्याच भाषा अवगत असायला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काय मूर्ख होते का? असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com