Congress on Marathi language : मराठी श्रेयासाठी काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची 'हनुमान उडी'; ठाकरे बंधूंच्या किती पचनी पडणार?

Congress Committed to Preserving Marathi Language Says Harshwardhan Sapkal in Buldhana : मराठी भाषा वाचवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली आहे.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Congress news : हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेशावरून ठाकरे बंधूंनी राज्यातील भाजप महायुती सरकारला झुकवलं. यानंतर हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्द झाला. ठाकरे बंधूंनी मुंबईत आवाज मराठी विजयी मेळावा घेत मराठी भाषेसाठी कुठलीही तडजोड स्वीकारणार नसल्याचा इशारा दिला.

आवाज मराठी विजयी मेळाव्यामुळे ठाकरे बंधूंनी राज्यात चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. मराठी भाषा वाचवण्याचं श्रेय घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी 'हनुमान उडी' घेतली आहे.

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या आवाज मराठी विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना, मराठी वाचवण्याचं श्रेय घेतलं. तसंच या विजयी मेळाव्याचं एक दिवस अगोदर निमंत्रण होते. पण पूर्वनियोजित कामामुळे जाणं शक्य झालं नसल्याचं स्पष्ट केले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "विजय मेळाव्याला जाणे न जाणे हा दुय्यम भाग आहे. मात्र आगामी काळात मराठी भाषा वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. हिंदी सक्तीच्या विरोधाला राजकीय पक्ष विविध संघटना यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाने सर्वात प्रथम विरोध केला होता, असा दावा देखील सपकाळ यांनी केला.

Harshwardhan Sapkal
Sanjay Gaikwad controversy : 'नकली शिवसेना, नकली वाघ, नकली दात'; ठाकरेंच्या वाघिणीनं गायकवाडांचा बुरखाच फाडला

ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाविकास आघाडीवर (MVA) परिणाम झाल्याचं अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. 'ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र आले आहेत, हे जसं-जसं समोर येईल, तसं-तसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वाची बोलून पुढील दिशा ठरवू. आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या किंवा कसे, यावर निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांवर दिलेली आहे', असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Harshwardhan Sapkal
BJP Ganesh Hake : भाजप नेत्याकडून शेतकऱ्याची थट्टा; मदतीऐवजी औत ओढतानांचं फोटोशूट, खुलासा करता करता दमछाक

ठाकरे बंधूंनी एकत्रित घेतलेल्या आवाज मराठी विजय मेळाव्याचे राज्यात काय पडसाद उमटले, यावर बोलताना सपकाळ म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित असलेले लोक कालपासून सुतकात आहेत. त्यांची हवा गोल झालेली दिसतेय', असा टोला सपकाळ यांनी लगावला.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे, ताराराणी, येसूबाई, जिजाऊ यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा हर्षवर्धन सपकाळ यांनी समाचार घेतला. 'त्यांना या आधीच वाचाळवीर ही पदवी देण्यात आलेली आहे. आणि महापुरुषांचा अपमान करण्याचं काम या वाचाळवीरांना नेमून देण्यात आलेलं आहे. ही दुर्दैवी वैचारिक दिवाळखोरी आहे', असा घणाघात सपकाळ यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com