Beed Politics : विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करा, सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा शुक्रवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याच मोर्चा मार्गावर परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांच्या समर्थकाने एक बॅनर झळकविले.
'गड्याहो मी पण तुमचाच समाज बांधव ना? माझ्यासाठी रस्त्यावर कधी उतरणार?', असा सवाल यामाध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. एकाच समाजातील दोन हत्या झालेल्या समाज बांधवांना न्याय मिळवून देताना असा दुजाभाव का? असेच या बॅनरच्या माध्यमातून भासवण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्तीचा होता, अशी चर्चा आहे.
दरम्यान, या बॅनरने एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही वेळातच हे बॅनर मोर्चा मार्गावरून हटवण्यात आले. बीड शहरात विलास घुले हत्या प्रकरणात न्यायासाठी निघालेल्या मोर्चादरम्यान लागलेल्या या बॅनरची दिवसभर जिल्हाभरात चर्चा होती. परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्येला दीड वर्षाहून अधिक काळ उलटूनही त्यांचे कुटुंब न्यायासाठी झगडत आहे. आज मोर्चाच्या मार्गावर गड्याहो मी पण तुमचाच समाज बांधव ना? माझ्यासाठी रस्त्यावर कधी उतरणार? असा प्रश्न उपस्थित करणारे बॅनर झळकले.
परळी येथील महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. त्यांच्या पत्नी न्यायासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. अनेक चौकश्या झाल्या, मात्र प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. मुंडे कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही. अशातच विलास घुले हत्येनंतर समाज आक्रमक झाला असून आज बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला.
याच मोर्चाच्या मार्गावर महादेव मुंडे यांच्या नावाने हे बॅनर लावण्यात आल्याने प्रशासन आणि समाज केवळ माणूस पाहून निर्णय घेतात का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. मोर्चादरम्यान काही वेळातच हे बॅनर हटवण्यात आले असले, तरी या घटनेची बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.