Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढेंचा ‘कडक’ पॅटर्न आता आरोग्य विभागात! मंत्री आबिटकरांची मोठी घोषणा

FDA Maharashtra, Prakash Abitkar : तुकाराम मुंढे यांच्या पॅटर्नवर आधारीत आरोग्य विभागातही गोपनीय तक्रार यंत्रणा; शासकीय आरोग्य योजनांतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा मंत्र्यांचा निर्धार.
Tukaram Mundhe, Prakash Abitkar
Tukaram Mundhe, Prakash AbitkarSarkarnama
Published on
Updated on

Health Department Maharashtra : अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्याकडून धडाकेबाज कारवाई केली जात आहे. त्यांच्या कारवाईला राज्य सरकारकडूनही पाठबळ मिळत आहे. आता मुंढे यांची ही कारवाई सरकारमधील अन्य विभागांनाही खुणावू लागली आहे. कारवाईचा हा मुंढे पॅटर्न अन्य विभागांमध्ये राबविण्यास सुरूवात झाली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीच याबाबत मोठी घोषणा केली आहे. धुळे शहरातील गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित महिला आणि बाल रुग्णालयाचे अखेर लोकार्पण करण्यात आले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमात आबिटकर यांनी शासकीय आरोग्य योजनांमध्ये होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि गोपनीय तक्रार प्रणाली सुरू करण्याची मोठी घोषणा केली.

नागरिकांना आपल्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात आणि तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवता यावी, यासाठी ही यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या तक्रार प्रणालीसाठी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनात राबवलेल्या पॅटर्नचा आधार घेण्यात येणार आहे. नागरिकांना आपल्या तक्रारी गोपनीय पद्धतीने नोंदवता येतील आणि त्यावर संबंधित विभागाकडून कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Tukaram Mundhe, Prakash Abitkar
ग्लॅमरने केला वर्दीचा घात; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काढले महिला DSP च्या निलंबनाचे आदेश

शासकीय आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचताना कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, तसेच यंत्रणेतील त्रुटी आणि गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नागरिकांना सुरक्षित माध्यम उपलब्ध करून देणे हा या प्रणालीमागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता आरोग्य विभागातील गैरप्रकारांनाही आळा घालण्याचे संकेत मंत्र्‍यांनी दिले आहेत.

Tukaram Mundhe, Prakash Abitkar
Tukaram Mundhe news : "हे डिपार्टमेंट मी नीटच करतो", असं CM फडणवीस म्हणाले अन् काही तासांतच नियुक्ती! तुकाराम मुंढे FDA मध्ये येण्याआधी पडद्यामागं काय घडलं?

दरम्यान, धुळे शहरातील महिला आणि बाल रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यामुळे महिला आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. ९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा संदर्भ घेत आरोग्य विभागात स्वतंत्र आणि गोपनीय तक्रार प्रणाली प्रत्यक्षात कशी राबवली जाते, तसेच त्यातून शासकीय आरोग्य योजनांमधील कथित गैरप्रकारांवर कितपत आळा बसतो, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com