Walmik Karad Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad : 'आका' जेलमध्ये असला तरीही...; वाल्मिक कराडबाबत DYSP गोल्डेंचा धक्कादायक जबाब, बीड पोलिसांच्या अडचणी वाढणार

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी धक्कादायक दावा केला आहे. कराड सध्या जेलमध्ये असला तरीही त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचं गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

Jagdish Patil

Beed News, 22 Apr : दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी धक्कादायक दावा केला आहे.

कराड सध्या जेलमध्ये असला तरीही त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचं गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. तसंच वाल्मिक कराड हा गुंड आहे हे माहिती असताना देखील बीड पोलिसांनी त्याच्या संरक्षणासाठी दोन कर्मचारी दिल्याचं गोल्डे यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणात पहिल्यापासून संशयास्पद भूमिकेत असलेले बीड पोलिस नव्याने वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केलं आहे.

पोलिसांच्या मदतीने आणि राजकीय पाठबळ असल्यामुळेच वाल्मिक कराडने खुलेआम बीडमध्ये अनेक गुन्हे केल्याचं हळूहळू उघडकीस येत आहे. शिवाय त्याने केलेली हत्या लपवण्यासाठी आणि त्याला पळून जाण्यासाठी अनेक पोलिसांनी मदत केल्याचंही बोललं जात आहे.

अशातच वाल्मिक कराड बीडच्या मध्यवर्ती कारागृहात असूनही जिल्ह्यात त्याच्या कार्यकर्त्यांकडून दहशत कायम ठेवली जात असल्याचा दावा गोल्डे यांनी केला आहे. शिवाय वाल्मिक कराड हा सराईत गुंड असल्याचं माहिती असतानाही बीड पोलिसांकडून त्याला संरक्षण देण्यात आलं होतं.

त्याच्या बंदोबस्तासाठी 18 अंमलदार आणि 2 आरसीपी प्लाटून तैनात केल्याची माहिती गोल्डे यांनी जबाबात दिली आहे. 22 जानेवारीला वाल्मिक कराड याला न्यायालयात हजर करताना 6 अधिकारी, 33 पुरुष व सहा महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. कराडने 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं.

तेव्हा त्याला खंडणी प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, कराडला पहिल्यांदा अटक झाली तेव्हाच त्याच्यावर सरपंच देशमुख यांचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा खळबळजनक दावाही विश्वांभर गोल्डे यांनी केल आहे.

सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना गोल्डे यांनी 23 फेब्रुवारी 2025 रोजी जबाब दिला होता. मात्र, हा जबाब आता समोर आला आहे. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्यामुळे सरपंच यांचे हत्या प्रकरणी बीड पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT