Zeeshan Siddiqui Threat : वडिलांच्या हत्येचा उल्लेख करत झिशान सिद्दीकी यांना मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी

Zeeshan Siddiqui Receives Death Threat : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल द्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.
Baba Siddiqui, Zeeshan Siddiqui
Baba Siddiqui, Zeeshan SiddiquiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 22 Apr : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल द्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.

या ई-मेलमध्ये 'जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा'; असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना होताच त्यांनी झिशान सिद्दीकी यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला आहे.

Baba Siddiqui, Zeeshan Siddiqui
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार..? आदिती तटकरेंनीच दिली माहिती

झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची मागील वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यांना देखील हत्येआधी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचं तपासानंतर स्पष्ट झालं.

Baba Siddiqui, Zeeshan Siddiqui
Nagpur Violence: नागपूर दंगलीतील देशद्रोहाचा आरोप असलेल्या हमीद इंजिनिअरला जामीन मंजूर

तेव्हापासून सिद्दीकी कुटुंबियांची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. असं असतानाही आता पुन्हा एकदा झिशान यांना धमकीचा मेल आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत पुढील तपासाला सुरूवात केल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com