MP Hemant Patil is with Uddhav Thackeray Sarakrnama
मराठवाडा

Hemant Patil Resign : मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या हेमंत पाटलांचा मोठा निर्णय, थेट खासदारकीवर सोडलं पाणी

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय....

Deepak Kulkarni

Hingoli News : आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहे.तर ठिकठिकाणी मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करतानाच त्यांच्या गाड्यांची तोडफोड करत लक्ष्य केले आहे. मराठा आरक्षणावरुन काही नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अशातच हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी आता शिंदे गटाकडून पहिला राजीनामा आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.

शिंदे गटाच्या खासदारांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील(Hemant Patil) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी पाटलांकडे आंदोलकांनी राजीनामा देण्याची मागणी केली. त्यांनी आंदोलकांची मागणी मान्य करत तत्काळ राजीनामा दिला.

यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात वणवा पेटला आहे.अनेक गावांमध्ये नेते, मंत्री,आमदार यांना प्रवेशबंदी करण्यात आली. जिथे जिथे नेते जातील तिथे मराठा आंदोलक जाऊन त्यांचा निषेध करत आहेत.

कोण आहेत हेमंत पाटील...?

शिवसेनेच्या तिकिटावर हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यांच्याकडे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून पाहिले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नांदेडयेथील घटनेत सरकारी रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह स्वच्छ करायला लावली होती.यामुळे त्यांनी वातावरण चांगलेच तापले होते.अशातच मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.

खासदार हेमंत पाटील हे यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे खासदार पाटील आले असता त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. आंदोलकांनी यावेळी आमदार, खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणप्रश्नी आपण दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, मराठा बांधवांची मागणी असेल तर एक मिनिटात राजीनामा देतो असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.व तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावे आपला राजीनामा लिहून दिला.

मराठा आरक्षणासाठी विविध जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी आपापले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देत सरकारला धारेवर धरले आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय.

...तर दिल्लीत उपोषण करणार

हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांचा ताफा आज हदगावमध्ये अडवण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि जरांगे यांच्या तब्येत काही झाले नाही पाहिजे असे आंदोलकांनी हेमंत पाटील यांना सांगितले. त्यावर दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार आहे असे हेमंत पाटील यांनी सांगितले.

अतुल बेनकेही राजीनामा देण्याच्या तयारीत...

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. आपण लवकरच यासंदर्भात मराठा संघटनांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं अतुल बेनकेंनी सांगितलंय. आ. अतुल बेनके यांनी मराठा आंदोलनात सहभागी होत मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरण्याचा निर्धार केलाय.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT