MP Election News : काँग्रेसची निवडणूक आयोगात धाव ; पंतप्रधान मोदी अन् मुख्यमंत्री चौहानांच्या विरोधात तक्रार

Madhya Pradesh Assembly Election : चित्रकूटमध्ये झालेल्या सरकारी कार्यक्रमाबाबत मध्य प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
Narendra Modi, Shivraj Singh Chouhan News
Narendra Modi, Shivraj Singh Chouhan NewsSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election News : चित्रकूटमध्ये झालेल्या सरकारी कार्यक्रमाबाबत मध्य प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात बोलतना काँग्रेस (Congress) मीडिया विभागाचे अध्यक्ष के. के. मिश्रा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चित्रकूटमधील सरकारी कार्यक्रमाला हजेरी लावली. हे आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Narendra Modi, Shivraj Singh Chouhan News
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल बैस यांची भेट

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे बुधनी विधानसभेचे भाजपचे (BJP) उमेदवार असताना सरकारी कार्यक्रमाला कसे जाऊ शकतात, असा प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केला. एका सरकारी कार्यक्रमात त्यांनी राजकीय भाषण केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे मिश्रा म्हणाले.

काँग्रेसने आणखी एक मुद्दा आयोगासमोर मांडला. निवडणुकीमुळे जे कर्मचारी आणि अधिकारी बाहेर ड्युटीवर असतात, त्यांना मतदानासाठी वॉलेट पेपर देण्यात यावेत जे आता दिले जात नाहीत. त्यांना मतदानापासून वंचित ठेवता कामा नये. मिश्रा म्हणाले, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. निवडणूक आयोग या दोन्ही प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करेल. राज्यात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मध्य प्रदेशात एकून 230 विधानसभा मतदारसंघ आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Narendra Modi, Shivraj Singh Chouhan News
NCP Political Crisis: अपात्र का करू नये ? विधिमंडळाच्या नोटिशीवर आमदार बाळासाहेब पाटलांची सूचक प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com