Babasaheb Manohare Sarkarnama
मराठवाडा

Babasaheb Manohare : आयुक्त बाबासाहेब मनोहरे प्रकरणात मोठी अपडेट; ‘गोळी झाडून घेण्यापूर्वी आयुक्तांना फोन आला होता’

Latur Corporation Commissioner : बाबासाहेब मनोहरे यांना आज लातूरहून एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलविण्यात आले आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात मनोहरे यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Vijaykumar Dudhale

Latur, 07 April : लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी (ता. ०५ एप्रिल) रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी झालेल्या मनोहरे यांच्यावर लातूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, मनोहरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बाबासाहेब मनोहरे (Babasaheb Manohare) यांनी शनिवारी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. त्यानंतर ते आपल्या खोलीत गेले होते. त्यानंतर काही वेळातच मोठा आवाज आला. तो ऐकून कुटुंबातील लोक त्यांच्या खोलीकडे धावले, त्यावेळी त्यांना बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्यापूर्वी त्यांना कोणाचा तरी फोन आला होता. फोनवर बोलल्यानंतर त्यांनी गोळी झाडून घेतली (Firing), असा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे मनोहरे यांना शेवटचा फोन कोणाचा आला होता. मनोहरे यांच्याशी संबंधित व्यक्ती काय बोलली, याची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, मनोहरे वापरात असलेला फोन लातूर पोलिसांनी जप्त केला आहे, त्यामुळे ते कोणाशी बोलले, त्यांना शेवटचा फोन कोणाचा आला होता, असे प्रश्न नातेवाईकांनी केलेल्या दाव्यामुळे उपस्थित होत आहेत.

बाबासाहेब मनोहरे यांच्या कवटीला इजा झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते. लातुरात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, त्यामुळे त्यांना आज लातूरहून मुंबईला हलविण्यात आले आहे. मनोहरे यांना लातूरहून एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला नेण्यात आले आहे.

मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात मनोहरे यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मुंबई विमानतळापासून कोकिलाबेन रुग्णालयापर्यंत पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. दरम्यान, मनोहरे यांनी नांदेड, धाराशिव, आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काम केलेले आहे. नांदेडमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांची लातूर महापालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT