Babasaheb Manohare : मोठी बातमी! महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंनी स्वत:वर गोळी झाडली, प्रकृती चिंताजनक

Municipal Commissioner Babasaheb Manohare Attempts Suicide : बाबासाहेब मनोहरे यांना प्रशासनात दीर्घ अनुभव आहे. त्यांनी नांदेड, धाराशिव, आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काम केलेले आहे.
Babasaheb Manohare
Babasaheb Manoharesarkarnama
Published on
Updated on

Babasaheb Manohare News : लातूर शहरात शनिवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला. लातूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र, सुदैवाने ते यातून बचावले. सध्या लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बाबासाहेब मनोहरे यांनी रात्री आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. जेवण केल्यानंतर ते आपल्या खोलीमध्ये गेले. त्यानंतर काहीवेळात गोळी चालवल्याचा आवाज आला. कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेत बाबासाहेब यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. गोळी डोक्याला उजव्या बाजुने आरपार गेल्याची माहिती आहे. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. गोळीने बाबासाहेब मनोहरे यांची कवटी फोडली आणि गोळी डोक्यातून बाहेर पडली. बाबासाहेब यांच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोचली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Babasaheb Manohare
Waqf Amendment Bill : सर्वात मोठी बातमी! वक्फ दुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली मंजुरी

या घटनेची माहिती मिळताच लातूर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. महापालिक अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राजकीय नेत्यांना देखील याची माहिती मिळताच त्यांनी देखील रुग्णालयाकडे धाव घेतली.

बाबासाहेब मनोहरे यांना प्रशासनात दीर्घ अनुभव आहे. त्यांनी नांदेड, धाराशिव, आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काम केलेले आहे. नांदेडमध्ये अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांची लातूर महापालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.

आत्महत्येचा प्रयत्न का?

बाबासाहेब मनोहरे हे स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. ते तणानात होते का याची देखील माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Babasaheb Manohare
Eknath Shinde's grand welcome : उपमुख्यमंत्री शिंदेंचं कोल्हापुरात ग्रँड वेलकम; आबिटकरांनी जाण ठेवत, स्वागतात सोडली नाही कुठलीच कसर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com