Ashok Chavan-Pratap Chikhlikar Sarkarnama
मराठवाडा

Nanded Bjp News : नांदेडमध्ये सूर्यकांता पाटील, किन्हाळकरांनंतर भाजपला आणखी एक धक्का; चिखलीकर समर्थकाची काँग्रेसमध्ये एंट्री

Sachin Waghmare

Nanded News : लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून भाजप सावरत असतानाच नांदेड जिल्ह्यात भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. भाजपचे नेते महाविकास आघाडीला जवळ करीत असल्याने भाजप बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला उर्जित अवस्था प्राप्त होईल, अशी शक्यता असताना लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार चिखलीकरांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर समीकरणच बदलले आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठपैकी सात मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. मराठवाड्यातील भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीना वेग आला आहे. महिनाभरात नांदेडमधील भाजपचे (Bjp) नेत्या व माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांच्यानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. चिखलीकरांचे कट्टर समर्थक आणि भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेससचा पंजा हातात घेतला आहे.

माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Chikhlikar) यांना नांदेड मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चिखलीकरांचे कट्टर समर्थक आणि भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेस कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला.

सुहास पाटील यांना अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनेक आढावा बैठकांमधून त्यांनी कार्यकर्त्यांवर पराभवाचे खापर फोडले होते. स्वतः चिखलीकर लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याचे समजते.

भोकर मतदारसंघासाठी सुहास पाटलांचे नाव चर्चेत?

भोकर मतदारसंघासाठी सुहास पाटील यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेस कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. भोकर मतदारसंघात विधानसभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या तयारी करीत असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात याठिकाणी पाटील विरुद्ध चव्हाण अशी लढत होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT