BJP Dharashiv News : विस्तार अधिकाऱ्यांना मोबाईल फोनवर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी धमकी दिल्याची फिर्याद बेंबळी (ता. धाराशिव) पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. विस्तार अधिकारी बच्चेसाहेब देशमुख यांनी शनिवारी (ता. १७ जून) या आशयाची फिर्याद दिली आहे. विकास कामांसाठी आलेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यास ते येथील पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षाने त्यांना धमकी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (BJP district president abuses extension officer who complained of malpractice; Filed complaint in police)
बेंबळीचे तत्कालीन ग्रामसेवक अंगद आगळे, महिला सरपंच वंदना कांबळे आणि जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाचे शाखा अभियंता बी. बी. शिंदे यांनी लाखोंचा घोटाळा केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे प्रयत्न मागील कांही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, अभियंता शिंदे यांनी घोटाळ्यातील रकमेचा भरणा केल्याने या प्रकरणी फिर्याद (Crime) दाखल झाली नव्हती.
दरम्यान, शिंदे यांचे नाव वगळून ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याविरुद्ध सुधारित फिर्याद देण्यास विस्तार अधिकारी बेंबळी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १७ जून) गेले होते. तेव्हा त्यांना अन्य एकाच्या फोनवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादी देशमुख यांचे म्हणणे आहे. यावरून त्यांनी पोलिसांत (Police) काळे यांच्या विरुद्ध तत्काळ फिर्याद दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बेंबळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालयात गेले आहेत. या दोन्ही फिर्यादीवरून अद्याप गुन्ह्याची नोंद झालेला नाही.
ज्यांच्या मोबाईलवर काळे यांचा फोन आल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. त्या पांडुरंग पवार यांनी सरपंचाचे पती नवनाथ कांबळे यांचा तो फोन कॉल आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. फिर्यादीत कांबळे ऐवजी काळे असा विपर्यास केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मी कोणालाही शिवीगाळ केलेली नाही : काळे
अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यासारखा आमचा पिंड नाही. आजपर्यंत आपण कोणालाही शिवीगाळ केलेली नाही. या प्रकरणाची माहिती मला समाज माध्यमावरून मिळाली आहे. याची सविस्तर माहिती घेऊ, असे भाजपचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी स्पष्ट केले.
शिवीगाळप्रकरणी फिर्याद दिली आहे : विस्तार अधिकारी
चौकशी अहवालावरून सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्या विरुद्ध बेंबळी पोलिसांत सकाळीच फिर्याद दिली आहे. फोनवरून शिवीगाळ आणि धमकी दिल्या प्रकारणीही दुसरी फिर्याद दिली आहे. गुन्हा नोंद होण्याची प्रतीक्षा सुरू आहे, असे धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बच्चेसाहेब देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.