Solapur Politic's : मी लिहून देते, भाजपच्या लोकांना विमानसेवा सुरू करणं जमणार नाही; काडादींच्या भेटीनंतर प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

आता बघूयात किती दिवसात तुम्ही तुमची विमानसेवा सुरू करताय, बघूयात बोरामणी विमानतळासाठी निधी आणून विमानसेवा सुरू करताय.
Dharmraj Kadadi-MadhukarChavan-Praniti Shinde
Dharmraj Kadadi-MadhukarChavan-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Siddheshwar Sugar Factory's Chimney : भाजपच्या लोकांनी वैयक्तीक दुश्मनी आणि राजकीय हेतूपोटी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली. आता बघूयात किती दिवसात तुम्ही तुमची विमानसेवा सुरू करताय, बघूयात बोरामणी विमानतळासाठी निधी आणून विमानसेवा सुरू करतायत. मी लिहून देते की त्यांना हे जमणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. (Praniti Shinde's criticism of BJP from the Chimney of Siddheshwar Sugar Factory)

सोलापुरातील (Solapur) सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) को-जनरेशनची चिमणी पडल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. आज काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत सत्ताधारी भाजपला चॅलेंज केले.

Dharmraj Kadadi-MadhukarChavan-Praniti Shinde
Rajan Patil News : राष्ट्रवादीच्या राजन पाटलांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा; माढ्याच्या खासदारासोबत अनगरमध्ये गुफ्तगू

त्या म्हणाल्या की, "बघूयात किती दिवसात तुम्ही तुमची विमानसेवा सुरु करताय, बघूयात ते बोरामणी विमानतळाला फंड आणून विमासेवा सुरु करताय.. मी लिहून देते की त्यांना ते जमणार नाही, त्याच्यावरून हे सिद्ध होतं की, फक्त वैयक्तिक राजकीय हेतूपोटी, दुश्मनी काढून चिमणी पाडण्यात आली आहे.

लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्यासाठी आणि पोटावर पाय देण्यासाठी हे सत्ताधारी ५० खोकेवाले आणि भाजप सरकार जबाबदार आहे. आम्ही काडादी आणि सभासद शेतकरी, कामगारांना मदत करण्यासाठी तयार आहोत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Dharmraj Kadadi-MadhukarChavan-Praniti Shinde
Modi @9 Maha Sampark Abhiyan : लोकं ७० वर्षांत चंद्रावर गेले, पण सांगोला अजूनही पाण्यासाठीच झगडतोय; प्रशांत परिचारकांचा रोख कुणाकडे?

दरम्यान, घडलेल्या सर्व प्रकारचा आम्ही निषेध करत आहोत. सर्व शेतकऱ्यांसोबत आमची सहानुभूती आहे. वैयक्तिक दुश्मनी आणि इगोमुळे हे केलं गेलं आहे. भाजपची मोडस ऑपरेटन्सी ही अशा पद्धतीने काम करायची आहे. ईडी आणि इतर संस्थांच्या मदतीने वैयक्तीक दुश्मनी काढण्याचे काम केले जात आहे.

Dharmraj Kadadi-MadhukarChavan-Praniti Shinde
Dharmraj Kadadi On Chimney : चिमणी वाचविण्यासाठी गेलेल्या काडादींना मुख्यमंत्री म्हणाले,‘ माझे हात बांधले गेले आहेत...’

भाजपवाल्यांना विकास काम कारणं जमत नाही. महाराष्ट्रातील लोकांना कसं मानसिक छळायचे, हेच त्यांना व्यवस्थित जमत"असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपावर तोफ डागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com