BJP
BJP  Sarkarnama
मराठवाडा

Haribhau Bagde on Emergency : 'ही एकप्रकारे इंदिरा गांधींनी देशात स्थापित केलेली..' ; हरिभाऊ बागडेंचे टीकास्त्र!

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar BJP News : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आजच्याच दिवशी म्हणजे 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. या निर्णयाच्या विरोधात तेव्हा रस्त्यावर उतरून अनेकांनी प्रतिकार करत संघर्ष केला होता. या लढ्यात सहभागी असलेल्यांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर भाजपच्यावतीने मंगळवारी करण्यात आला.

इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी म्हणजे देशावर लागलेला एक कलंक असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 'आणीबाणी सारख्या अन्यायकारक आणि लोकशाहीची मुस्कटदाबी करणाऱ्या घटनेला आज 49 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपच्या वतीने आपातकाल दिन कार्यक्रम घेण्यात आला.', असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाजपने(BJP) म्हटले की, 'आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील 1975−77 दरम्यान 21 महिन्यांचा काळ होता. या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती.

तसेच, तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील कलम 352(1) खाली आणीबाणी जारी केली. इंदिरा गांधी यांनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले, ही एकप्रकारे इंदिरा गांधी यांनी देशात स्थापित केलेली एकाधिकारशाही होती.' असंही बोललं गेलं.

तसेच अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह अनेक नेत्यांना तेव्हा तुरुंगात डांबण्यात आले होते. प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर(RSS) बंदी आणली गेल्याचा निषेध म्हणून भाजपाच्या आज त्या काळात आणीबाणीच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार भाजपच्या वतीने करण्यात आला. काँग्रेसने देशातील जनतेवर लादलेली आणिबाणी जनता कधीच विसरू शकत नाही.', अशा शब्दात भाजपने या घटनेचा निषेध या निमित्ताने केला.

लोकशाहीच्या रक्षणासाठी निरंतर संघर्ष करणाऱ्या समस्त देशवासीयांच्या त्याग आणि बलिदानाला नमन करत आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभे राहिलेल्या ॲड. निंबोरकर, मुरारी भाऊ जोशी, सुधीर विध्वंस, सुधाकरराव नेवपुरकर, संजय सदगुले, मोहिनीराज देशमुख, एकनाथ गवळी, विसूभाऊ काळे, मधुकरराव पूर्णपात्रे, अनंत आचार्य, रामभाऊ अप्पा गावंडे आदी मान्यवरांचा सत्कार आमदार हरिभाऊ बागडे(Haribhau Bagde) यांच्या हस्ते करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ॲड.निंबोरकर, मधुकर पूर्णपात्रे यांनी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. तिकडे संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली तेव्हा काँग्रेसने त्यांना संविधान दाखवत त्याप्रमाणे वागण्याचा सल्ला दिला. तर भाजपने इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीची आठवण करून देत पलटवार केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT