BJP MLA Rana Jagjitsinh Patil’s absence from the Murum health camp banner has fueled fresh discussion over BJP internal politics in Dharashiv. Sarkarnama
मराठवाडा

BJP Dharashiv Politics : धाराशिव भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर? भाजप नेत्याला डावललं पण निमंत्रणपत्रिकेत ठाकरेंच्या नेत्याचा फोटो

Dharashiv BJP internal politics : राणा जगजितसिंह पाटील यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून डावलले जाण्याची ही पहिलीच वेळ नसल्याची चर्चा आहे. यापूर्वी बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या बॅनर आणि निमंत्रणपत्रिकेवरूनही असाच प्रकार समोर आला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील मतभेदांची चर्चा आता पुन्हा ऐरणीवर आली आहे.

Jagdish Patil

Dharashiv News, 06 News : भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे धाराशिव जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. उमरगा तालुक्यातील मुरूम येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिराच्या निमंत्रणपत्रिका आणि बॅनरवरून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव आणि फोटो नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे भाजपमधील दोन नेत्यांमधील राजकीय संघर्षाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिर आमदार बसवराज पाटील यांच्या पुढाकाराने आणि शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाच्या बॅनरवर भाजपमधील अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले असताना राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो नसल्याने हा मुद्दा लक्षवेधी ठरला आहे. निमंत्रणपत्रिकेतही त्यांचे नाव नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांचेही नाव पत्रिकेत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिका आणि बॅनरवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांचे नाव असल्याने चर्चेला उधाण आलं आहे. भाजपच्या कार्यक्रमात पक्षातील प्रमुख नेत्याचे नाव नसणे आणि दुसऱ्या पक्षातील आमदाराला स्थान मिळणे, यामागे नेमके राजकीय कारण काय, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राणा जगजितसिंह पाटील यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून डावलले जाण्याची ही पहिलीच वेळ नसल्याची चर्चा आहे. यापूर्वी बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या बॅनर आणि निमंत्रणपत्रिकेवरूनही असाच प्रकार समोर आला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील मतभेदांची चर्चा आता पुन्हा ऐरणीवर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT