

Maratha Reservation News : मराठा आरक्षण आणि जातीचे दाखले या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य शासन मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर गंभीर आहे. मराठा आणि ओबीसी समाज घटकांत वाद होऊ नये याची दक्षता शासन घेत आहे. विरोधी पक्ष मात्र हा प्रश्न चिडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या मागण्या याबाबत सरकारने काही पावले टाकली आहेत. बऱ्याचशा मागण्या मान्य देखील झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न शासन गांभीर्याने घेत आहे, असे महाजन म्हणाले.
कोणताही प्रश्न चिघळवण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप महाजन यांनी केला. सध्या देखील असेच प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते यशस्वी होणार नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना कोणताही जनाधार उरलेला नाही. त्यामुळे हे नेते विविध आंदोलनांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. सरकार विरोधी आंदोलनाला पाठिंबा देतात.
या नेत्यांनी आंदोलन केले तर 500 लोक देखील त्यांना समर्थन देणार नाही अशी स्थिती आहे, या शब्दात मंत्री महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना अजिबात महत्त्व देण्याची गरज नाही. त्यांचे तर सर्वच अवयव तपासण्याची गरज आहे, या शब्दात महाजन यांनी राऊत यांचे आरोप उडवून लावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.