Kirit Somaiya  Sarkarnama
मराठवाडा

kirit Somaiya News : किरीट सोमय्या यांचा दुसऱ्यांदा सिल्लोडचा दौरा, चारशेवर रोहिंग्यांची यादी देत गुन्हा दाखल करण्याची मागणी!

BJP leader Kirit Somaiya embarks on his second visit to Sillod, demanding the filing of cases related to fake birth certificates. : सिल्लोड नगरपरिषदेसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधून केवळ आधार कार्डांच्या आधारे अशा बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

Jagdish Pansare

BJP Politics : राज्यात अडीच लाखावर बांगलादेशी घुसखोरांना बोगस आधार कार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दौरे करत त्यांनी या संदर्भातील पुरावे गोळ करत रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दुसऱ्यांदा दौरा करत 406 रोहिंग्यांची यादी उपविभागीय अधिकारी तसेच पोलीसांकडे सुपूर्द करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात 2023 मध्ये सर्वाधिक बोगस जन्म प्रमाण पत्रांचे वाटप करण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

सिल्लोड नगरपरिषदेसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधून केवळ आधार कार्डांच्या आधारे अशा बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. (BJP) या बोगस प्रमाणपत्रांची संख्या पाहता राज्यात सिल्लोड तालुका हा अव्वल ठरत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. मंगळवारी दुसऱ्यांदा किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार संजय भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

राजकीय दबावातून हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप करत तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींकडून केवळ आधार कार्डच्या आधारे बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. ज्यांनी अशा प्रकारे प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे, त्या सर्वांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी सिल्लोड शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत केली आहे.

किरीट सोमय्या यांनी यापुर्वीही सिल्लोडचा दौरा करत उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेत त्यांच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार केला होता. तसेच त्यांनी सिल्लोड नगरपरिषदेच्या सीईओंचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या कित्येक वर्षात आले नाही एवढे जन्म प्रमाणपत्रांसाठीचे अर्ज एका वर्षात आल्याचा दावा यावेळी सोमय्या यांनी केला होता.

याशिवाय स्थानिक भाजप पदाधिकारी आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात बोगस आधार कार्डाच्या आधारे मतदार यादीत तब्बल 25 हजारावर मतदारांची नावे नोंदवण्यात आल्याचा आरोप केला होता. बांगलादेशी रोहिंगे आणि बोगस मतदार यादीच्या प्रकरणाने सिल्लोड तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT